” लाईट ऑफ लाईफ” ट्रस्ट संस्थेकडून विनामूल्य शैक्षणिक साहित्य वितरण.

62

“लाईट ऑफ लाईफ” ट्रस्ट संस्थेकडून विनामूल्य शैक्षणिक साहित्य वितरण.

 शैक्षणिक साहित्य वितरण.

विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशिम:-  लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट गेल्या अकरा वर्षापासून वाशिम जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर, शेलुबाजार , मानोरा, शेंदुरजुना , पार्डी टकमोर , धाकली आणि महान याठिकाणी दुर्लक्षित व दुर्गम भागातील अनाथ, एकल पालक, आदिवासी आणि गरीब मुलांसह कार्यरत आहे. प्रत्येक मुल शाळेत जाईल व त्याचा जीवनाचा सर्वांगिन विकास व्हावा या हेतूने ही संस्था दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी 490 विद्यार्थ्यांसह कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून याहीवर्षी अशा या बिकट कोरोनाच्या परिस्थितीत सुद्धा याहीवर्षी शेलूबाजार सेंटर येथे 23 ऑक्टोंबर 2020 रोजी 70 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्यामध्ये शालेय बॅग, नोटबुक, कॅमल कंपास पेटी , ड्रॉइंग बुक, ग्राफ बुक , शालेय पुस्तके इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लखमीचंद कनिष्ठ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गीरहे सर , ” लाईट ऑफ लाइफ ट्रस्टचे” प्रकल्प अधिकारी श्री. राम हरी इरकर सर , श्री . सावंत सर सोशल वर्कर श्री . उमेश पुरी सर गणित शिक्षक सौ‌. गिरी मडम इंग्रजी शिक्षीका प्रमुख उपस्थित होते . कोरोना रोगाचा विचार करता, मास्क , सैनिटाइजर , सोशल डिस्टन्स सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांना साहित्य वितरण केले. शेवटी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी डॉक्टर विली मडम चे आभार मानले