12 वर्षीय नदीत पडून मृत्यु. सुध घेणार कुणी नाही.

49

12 वर्षीय नदीत पडून मृत्यु. सुध घेणार कुणी नाही.

मुस्कानला कधी मीळणार न्याय?

 

 पल्लवी मेश्राम प्रतिनिधी

नागपुर:- 14 ऑक्टोबर रोजी पिली नदीत संगम नगरात राहणा-या 12 वर्षांच्या निरागस मुस्कानच्या प्रशासनाच्या लापरवाई ने पिली नदीत बुडल्यामुळे वेदनादायक मृत्यूने मृत्यू झाला होता. हा अपघात कसा झाला? याला जबाबदार कोण? हे जाणून घेण्यासाठी समाजसेवक निशा खान, मोहम्मद वसीम, परवेझ भाई, मुबिन खान, पल्लवी मेश्राम हे मुस्कान अन्सारी यांच्या घरी गेले आणि कुणी जनप्रतिनिधी किंवा पालकमंत्री कुटुंबाला भेटायला आले नाही अशी बातमी ऐकून त्यांना फार वाईट वाटले.

कुणी या परीवाराच्या दु: खामध्ये सामील झाले नाहीत, परंतु काही लोकांनी या मुस्कानच्या मृत्युचे राजकारण रंगवुन समाजात आपले राजकरण केले.

त्याच कुटुंबातील मुस्कान ची बहिण ज्वारीया जी दहावीत शिकत आहे, तिच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी समाजसेवीका निशा खान यांनी घेतली आणि काल तिला दहावीच्या शिक्षणाचे संपूर्ण पुस्तक ज्यरिया ईला देण्यात आल्या.

मुस्कान अन्सारी यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून 50 लाख रुपयांची मागणी केली गेली जेणेकरून त्याचा परिवार स्वावलंबी व्हावे!
या संपूर्ण अपघाताची कथा, जेव्हा त्याच्या कुटुंबानी समाजिक कार्यकर्त्याना सांगितली तेव्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. आई, बहीण आणि वडीलांनी यांच्या शब्दत सांगितले.

पिली नदीचा हा पूल जो आठ क्षेत्रांना जोडतो, त्या पुलाचे काम 2 वर्षांपासून मंदगतीने सुरु आहे, ज्यामुळे लोकांना धोकादायक मार्गाने जाव लागत असल्यामुळे
गेल्या 2 वर्षात 4 मुले या नदीत बुडून मृत्यूमुखी पडली. यासाठी कोण जबाबदार आहे?
शासन प्रशासन, पीडब्ल्यूडी वरिष्ठ अधिकारी की मनपा ?