बोली भाषेत मजेशीर भाष्य करणारा आशिष बोबडे नावाचा तरुण हा कोण
‘चिमूर का छोकरा ‘ कोण ?

‘चिमूर का छोकरा ‘ कोण ?
त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
चिमूर : – चिमूर का छोकरा हा एक यूट्यूब चॅनेल आहे आणि या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला मजेशीर डब्बिंग व्हिडिओ पहायला मिळतात. कदाचित तुम्ही यांचे व्हिडिओ पाहिले असेल.
विदर्भात सहज बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेत मजेशीर भाष्य करणारा आशिष बोबडे नावाचा तरुण हा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर चा आहे.
आशिष ने यूट्यूब ची सुरुवात २०१७ मध्ये केली होती.
प्रसंग राजकीय असो व सामाजिक ,आर्थिक समस्या असो व वाईट चालिरीतीवर भाष्य करणारा चिमूर का छोकरा हा यूट्यूब चॅनेल वर चर्चेत आहे.व्हिडिओ मध्ये आपला आवाजाने मजेशीर व्हिडिओ बनवतो व यूट्यूब द्वारे लोकांचा मनोरंजन करतो.
आशिष चे आता ३.५ लाख सबस्क्राईबर आहेत आणि आशिष बोबडे हा विदर्भातील एक प्रसिध्द यूट्यूबर आहे. तो यूट्यूब ने जवळपास ७० ते ८० हजार रूपये महिन्याचे मानधन ही कमावतो. तो मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवतो. तो चिमूर मध्ये एका खासगी पतसंस्थेत क्लर्क ची नोकरी सुद्धा करतो.
आशिष सांगतो की जर तुमच्याकडे काही वेगळी क्रिएटिव्हीटी असेल काही करण्याची आयडिया असेल तर तुम्ही पण यूट्यूब ने आपला करियर बनवू शकता.