नागभीड न.प.मध्ये अग्निशामन वाहन खरेदीत भ्रष्टाचार झालाच नाही.
सात्ताधारी गटा कडुन पञकार परिषदेत खुलासा.

सात्ताधारी गटा कडुन पञकार परिषदेत खुलासा.
✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड : – नगरपरिषद नागभीड मध्ये आग्नीशमन वाहन खरेदी संदर्भात विरोधी नगर सेवकांनी जे आरोप केले आहेत, ते सपशेल खोटे असून सहा महिन्यावर आलेली न.प.ची निवडणूक लक्षात घेऊन सत्तारूढ गटाला नाहक बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा पलटवार नगर परिषदे येथिल सत्ताधारी गटाच्या वतीने मंगळवारी नगरपरिषदेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यांनी दिलेल्या माहीती नुसार विरोधी गटाने जे आरोप केले आहेत, ते चार वर्षापूर्वीच्या लेखापरिक्षणातील आहे.या आक्षेपांची यापूर्वीच पूर्तता करण्यात आली आहे.आणि हे आक्षेपही पैशाच्या बाबींवर नाही तर तांत्रिक बाबीवर होते.हे वाहनासाठी ८० टक्के रक्कम शासनाकडून तर २० टक्के रक्कम नगर परिषदेची आहे.साधे एखादे जेसीबी वाहन खरेदी करतो म्हटले तर ३० ते ३५ लाख रूपये लागतात.मग एवढे मोठे अग्नीशमन वाहन २९ लाखात कसे मिळेल, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या वाहन खरेदीत एका रूपयाचाही भ्रष्टाचार झाला नाही.सर्व नियमांची पूर्तता करूनच अग्निशामन वाहन खरेदी करण्यात आलेआहे.चिमूर, सिंदेवाही, पोंभूर्णा आदी ठिकाणचीही ही वाहन खरेदी याचप्रकारे झाली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
गेल्या चार साडेचार वर्षात नगर परिषदेतंर्गत नेत्रदीपक कामे झाली आहेत.ही कामे विरोधकांच्या डोळ्यांत खुपत आहेत.या विरोधी नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावर कधीही सहकार्य केले नाही.केवळ नगर परिषदेची बदनामी कशी करता येईल याचेच प्रयत्न केले.आरोपकर्ते हे नगर परिषदेचे अधिकृत गटनेते नाहीत.पत्रकार परिषदेत खोटी माहिती देऊन जनतेची दीशाभूल करणाऱ्यांविरूद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.यावेळी नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासात्मक कामांची माहिती देण्यात आली.पञकार परिषदेला यावेळी नगराध्यक्ष प्रा.डॉ.उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती सचिन आकूलवार, आरोग्य सभापती सौ.अर्चना मरकाम, नगरसेवक शिरीष वानखेडे, प्रशासकीय अधिकारी निलिमा रामटेके यांची उपस्थिती होती.