आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा कोरोना कामावर बहीस्कार

51

आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा कोरोना कामावर बहीस्कार

आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा कोरोना कामावर बहीस्कार
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा कोरोना कामावर बहीस्कार

✒अरूण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – नागभीड तालुक्यातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी तालुक्यातील कोरोनाग्रस्त भागात व कोरोणा संबंधी कोणतेही काम करणार नसल्याचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले आहे. शहरी आशा वर्कर यांना खनीज निधीतुन नव महीन्याचे मानधन देण्यात आले. माञ ग्रामीण भागातील आशा वर्कर व गाट प्रवर्तक यामध्ये भेदभाव केल्या जात आहे.जे काम शहरी आशांनी केले तेच काम ग्रामीण भागातील आशांनी केले मग हा भेदभाव उचीत नाही. कोराणा काळात आशांनी जिवाची पर्वा न करता काम केले.रुग्णांना सेवा दीली. माञ मानधन देण्यास चालढकल करत आहेत. यानंतर कोरोणा विषयक कोणतेही काम,लसीकरण, अहवाल आशा व गट प्रवर्तक देणार नाही. जो प्रयंत कोरोणा काळातील मानधन देणार नाही तो प्रयंत कोरोणा संबधीत कामे केल्या जाणार नाही . याबाबतचे लेखी निवेदन आशा व गट प्रवर्तक यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले आहे.