उप पोलीस स्टेशन देचली पेठाचा आदिवासी बांधवकरिता स्तुत्य उपक्रम गोरगरीब आदिवासी लोकांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून समाजासमोर ठेवला आदर्श……..

50

उप पोलीस स्टेशन देचली पेठाचा आदिवासी बांधवकरिता स्तुत्य उपक्रम
गोरगरीब आदिवासी लोकांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून समाजासमोर ठेवला आदर्श……..

उप पोलीस स्टेशन देचली पेठाचा आदिवासी बांधवकरिता स्तुत्य उपक्रम गोरगरीब आदिवासी लोकांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून समाजासमोर ठेवला आदर्श........
उप पोलीस स्टेशन देचली पेठाचा आदिवासी बांधवकरिता स्तुत्य उपक्रम
गोरगरीब आदिवासी लोकांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून समाजासमोर ठेवला आदर्श……..

धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

*गडचिरोली :* अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपविभागा अंतर्गत येत असलेल्या उपपोस्टे देचलीपेठाच्या वतीने देचलीपेठा येथे आदिवासी बांधवासोबत दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून हद्दीतील गोरगरिब आदिवासी जनतेला विविध साधनाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास पोस्टचे सर्व जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी, सीआरपीएफ बटालियन क्र 13 चे अधिकारी व जवान , राज्य राखीव बल गट क्र 04 चे अधिकारी व कर्मचारी तसेच देचली गावचे सरपंच दिवाकर मडावी, उपसरपंच वंदना कुमरे , शिक्षकवृंद, वनविभागाचे कर्मचारी, पोलिस पाटील यांचेसह पोस्ट हद्दीतील 500 ते 600 ग्रामस्थ उपस्थित होते
*दिवाळी फराळासह कपडे व किराणा साहित्याचे वाटप* :- उप पोस्टे चे प्रभारी अधिकारी सुधिर साठे, पो उप नि गोविंद कटिंग, पो उप नि भारत वर्मा व कर्मचारी तसेच सीआरपीएफ चे अधिकारी असिस्टंट कमांडंट शकील साहेब व त्यांचे जवान यांचे सर्वांचे सहकार्याने अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील या गोरगरीब आदिवासी जनतेला मदतीचा हात म्हणुन दैनंदिन जीवनात लागणाऱ्या किराणा वस्तूचे वाटप करण्यासाठी आर्थिक हातभार लावला होता. या भागातील मागासलेल्या गोरगरीब आदिवासी जनतेला पोलीस स्टेशन देचलीपेटा तर्फे एकूण 300 आदिवासी कुटुंबीयांना साखर,चहा पावडर, तेल, तुरडाळ, पोहे ,हळद, मिरची, मीठ, साबण, कोलगेट ,बिस्कीट अशा दैनंदिन लागणाऱ्या वस्तू वाटप केल्या,तसेच *कल्याणमस्तु परिवार मुंबई चे संस्थापक निलेश भाई शहा* यांनी या दुर्गम भागातील आदिवासी लोकांसाठी कपडे पाठविले होते. पाठविण्यात आलेले कपडे या कार्यक्रमात आदिवासी बांधवांना वितरित करण्यात आले. अशा प्रकारे उप पोलीस स्टेशन देचलीपेठाचे अधिकारी व कर्मचारी सीआरपीएफ चे अधिकारी व कर्मचारी तसेच कल्याणमस्तु परिवार मुंबई चे संस्थापक माननीय निलेश भाई शहा यांनी हद्दीतील गोरगरीब आदिवासी बांधवांना किराणा साहित्य व कपडे भेट स्वरूपात वाटप करून आदिवासी बांधवासोबत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. तसेच उप पो स्टे देचली पेठा च्या वतीने मदत केल्यामुळे गडचिरोली पोलीस दलाविषयी आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे. मिळालेल्या मदतीने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
सदर कार्यक्रम दरम्यान प्रभारी अधिकारी यांनी पोलीस दादालोरा खिडकीमार्फत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना ची माहिती देऊन त्याचा लाभ घेणेबाबत नागरिकांना प्रोत्साहित केले.
उप पोलीस स्टेशन देचलीपेठा व कल्याणमस्तु परिवार मालाड प मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक श्री.अंकित गोयल सा. अप्पर पो अधि.श्री सोमय मुंढे सा.,श्री समीर शेख, श्री अनुज तारे सा. यांच्या संकल्पनेतून व जिमलगट्टा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस स्टेशन देचलीपेठा चे प्रभारी अधिकारी सुधिर साठे, पो उपनि गोविंद खटिंग, पो उपनि भारत वर्मा तसेच सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडंट शकील सा यांच्या नियोजनात सर्व पोलीस बांधवानी अथक परिश्रम घेऊन दि. 22/11/2021 रोजीचा आदिवासी बांधवांसोबत दिवाळी हा कार्यक्रम पार पडला.