चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
बाकर्यांनची ओली पार्टी

बाकर्यांनची ओली पार्टी
राहुल भोयर मो9421815114
ब्रह्मपुरी:- आता काही महिन्यातच असे म्हणा की काही दिवसातच फेब्रुवारी मार्च मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लागणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका पक्ष्यांच्या बकऱ्यांच्या बलिदानातून बकऱ्याच्या बलीच्या ओल्या पार्ट्या रंगतीने रंगतदार बनत आहेत.
आणि अशा ओल्या पार्टीची मेजवानी कार्यकर्त्यांना / मतदात्यांना दीली जात आहे.
अशाच प्रकारची एक ओली पार्टी खरकाडा येथील एका भव्य इमारतीत रात्रीच्या वेळी आटोपली ( पार पडली. )
पार्टीमध्ये अनेक बकऱ्यांचा बळी घेण्यात आला व या बळीतून पार्टीला रंगत आणण्यात आली.
निवडणूक आली की राजकीय पक्ष सक्रिय होतात व कार्यकर्त्यांना व मतदारांना प्रलोभित करण्याकरिता विविध प्रकारच्या योजना तयार करून घेतात.
मात्र एकदा का निवडणुका संपल्या की उमेदवार जे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात ते या मतदारांना व अश्या चटयी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना पाच वर्ष कसल्याही प्रकारची प्रतिष्ठा सुद्धा देत नाही आणि विशेषता ज्या घराण्यामध्ये नेतेगिरी सुरू आहे अशांनाच निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळतो आणि जे चटयी उचलणारे सच्चे कार्यकर्ते आहेत. अशांना मात्र त्यांनी तिकिट मागितले तरीसुद्धा त्यांना जाणून बुजून डावलल्या जातो. त्यांची लायकी फक्त आर्थिक तेने तपासल्या जातो.
आपण सुसज्ज कार्यकर्ते आणि सुज्ञ मतदार आहात तेव्हा आपण उमेदवार कसा असावा हे आपण स्वतः ठरवायचं आहे.