विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१ निवडणूक निरीक्षक डॉ.दिलीप पांढरपट्टे अकोल्यात दाखल

62

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१

निवडणूक निरीक्षक डॉ.दिलीप पांढरपट्टे अकोल्यात दाखल

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016

अकोला : – महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२१ साठी अकोला जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती राज्य निवडणूक आयोगामार्फत करण्यात आली आहे. डॉ. पांढरपट्टे हे आज अकोला येथे दाखल झाले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे स्वागत केले. तेथील कक्षात थाटण्यात आलेल्या तात्पुरत्या कार्यालयात डॉ. पांढरपट्टे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. मतदार संघाची तसेच मतदान व अन्य अनुषंगिक तयारीची माहिती घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आर.बी. हिवाळे आदी उपस्थित होते.