कोणाच्या आशिर्वादने भेटू लागली दारोदारी दारु?

54

कोणाच्या आशिर्वादने भेटू लागली दारोदारी दारु?

मुकेश चौधरी

हिंगणघाट: – शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री जोर धरत आहे. या सोबत शहरात सट्टा बाजार तेजीत आला असून गांजा सारखे अमली पदार्थ देखील खुले आम मिळू लागले आहे. इतके कडक निर्बंध असताना शहर भर दारू विक्री होत आहे, यावरून पोलीस व दारू विक्रेते यांच्यात अभद्र युती असल्याची चर्चा हिंगणघाट शहरातील जनते मध्ये जोर धरू लागली आहे.

शहरातील सर्वच भागात सरास पणे अवैध दारू विक्री होत आहे. आणि या दारू विक्रेत्यांना काही भ्रष्ट पोलिसांची साथ असल्याने त्यांचा धंदा तेजीत आला आहे. अधिकारी व पोलीस शिपाई यांनी या दारू विक्रेत्याशी अलिखीत करार करून आपले खिसे गरम करीत आहे. शहरात गेल्या दहा वर्षापासून तैनात पोलीस शिपाई या मागचा सूत्रधार असल्याची चर्चा आहे. त्याचे वरीष्ठ अधिकाऱ्या सोबत लांगे बांधे असल्याने त्याला स्वगृही राहण्याची मुभा मिळत आहे. याचा फायदा घेत हा पोलीस शिपाई अधिकारी व अवैध दारू विक्रेते यांच्यात समन्वय साधून आपलेही खिसे गरम करीत आहे. अधिकाऱ्या सोबत जवळीक असल्याने त्याने आपली नेमणूक तुकडोजी चौक ते रेल्वे स्टेशन परिसरात करून घेतली आहे. आता तर त्याने स्वतः चीच दारू विक्री करणारी चमू बनविली आहे. आणि महाविद्यालयाच्या पोरांना हाताशी धरून तो सुद्धा दारू विक्री करीत आहे. या पोलिसाचा वरदहस्त असल्याने ते पोर सुद्धा निर्ढावलेले आहे. रस्त्याने जाणाऱ्या मुलीची छेड काढण्याची हिम्मत करीत आहे. अश्या प्रकारे याने मोठी माया जमवून ८० लाखाची जागा घेतली असल्याची चर्चा आहे. त्याच्या या एकछत्री कारभारावर कुणाचेच वचक नसल्याने शहरात अवैध दारू विक्री जोर धरीत आहे.