डिसेंबर महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर

58

डिसेंबर महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर

डिसेंबर महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर
डिसेंबर महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा दि.२६/११/२१ -राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना डिसेंबर महिन्याचे अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात आले आहे.
नियमित प्राधान्य कुंटूंबातील लाभार्थी, एपीएल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना गहू प्रति व्यक्ती 3 किलो 2 रुपये दराने, तांदूळ 2 किलो 3 रुपये दराने, नियमित अंत्योदय योजना गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो. याप्रमाणे पुरवठा करण्यात येईल. साखर अंत्योदय योजने अंतर्गत प्रती शिधापत्रिका 1 किलो प्रमाणे किंवा साठा उपलब्धतेनुसार 20 रुपये किलो दराने उपलब्ध होणार आहे.
केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 व्यक्ती 2 लिटर , 2 व्यक्ती 3 लिटर व 3 व्यक्ती वरील केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिका 4 लिटर याप्रमाणे देय राहील. गॅस सिलेंडर धारकांना केरोसिन देय राहणार नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.