जिल्हयातील चार नगर पंचायत निवडणूकी करीता आचार संहिता लागू

53

जिल्हयातील चार नगर पंचायत निवडणूकी करीता आचार संहिता लागू

जिल्हयातील चार नगर पंचायत निवडणूकी करीता आचार संहिता लागू
जिल्हयातील चार नगर पंचायत निवडणूकी करीता आचार संहिता लागू

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

२१ डिसेंबरला होणार मतदान
वर्धा, दि.२६/११/२१ राज्यातील नगरपंचायत सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. त्यानुसार वर्धा जिल्हयातील आष्टी, कारंजा(घाडगे), सेलू व समुद्रपूर या चार नगर पंचायतीच्या सदस्य पदासाठी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून संबंधित नगर पंचायत क्षेत्रात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. ही आचार संहिता निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत लागू असणार आहे. आदर्श आचार संहिता भंग होणार नाही यांची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.