26 नोव्हेंबर संविधान दिवस. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लेखीका:- उषाताई कांबळे, राह. सांगली

ब्रिटिशानी भारताला स्वातंत्र्य देण्याचे जाहीर केल्या नंतर स्वतंत्र्य भारतासाठी स्वता:ची घटना तयार करण्यासाठी परिषद निवडण्यात आली आणि या घटना परिषदवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल मधून निवडून गेले होते. घटना परिषदेचे कामकाज डॉ. राजेन्द्र प्रसाद अध्यक्ष असलेने घटना परिषदचे कामं 9 डिसेम्बर 1946 रोजी सुरु झाल.
घटना परिषदेतिल पहिल्या भाषणातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना चकित केलं घटना लिहिण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष पद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देनेत आलं. या मसुदा समितीत सात सदस्य होते, मात्र समितीच्या बैठकीला कोणी हि सहसा उपस्थित राहत नसत त्यामूळे भारतीय संविधान लिहण्याची सर्वच जबाबदारी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचावर आली. प्रकृती खालावत असताना ही त्यांची तम्मा बागळता रात्र न दिवस संविधानाचा मसुदा तयार करून स्वातंत्र्य भारताचे संविधानरुपी घटनेच कामं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्या निच पूर्ण केलं. मसुदा समितीतील सात पैकी एकाचे निधन झाले. एक जण आपल्या राज्याचा कामात राहायाचेज़ एक दोघे प्रकृतीच्या नावाखाली व अन्न कारणास्तव दिल्ली बाहेर होते. त्यामुळे भारतीय राज्यघटना तयार करण्याच संपुर्ण श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिल जात. म्हणूनच त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हंटल जाते.
भारतीय राज्य घटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात पुर्ण तयार हौऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्य घटना स्विकारण्यात आली. आणि या राज्य घटनेची अमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासुन सुरु झाली. आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. म्हणून 26 नोव्हेंबर “संविधान दिवस” आणि 26 जानेवारी हा दिवस “प्रजासत्ताक दिन” म्हणून साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतात लोकशाही बरोबरच सामाजिक आणि राजकीय आर्थिक लोकशाही निर्माण करायची होती त्यामुळेच त्यांनी प्रत्येक माणसाला समान मूल्य, आणि सामान प्रतिष्ठा, समान संधी राज्य घटनेच्या माध्यमातून दिली. डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेचा केंद्र बिंदू हा माणुस आणि त्याचा विकास हाच मानला होता. डॉ. आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाने दिलेल्या तत्वज्ञान स्वतंत्र, समता बंधूता आणि न्याय या मुल्यावरच भारतीय संविधानात लोकशाही तत्वाचा पुरस्कार करणारी राज्यघटना भारतास दिली.
डॉ. आंबेडकर आंबेडकर असे स्पष्ट नमूद करतात की स्वतंत्र, समता, बंधूता आणि सामाजिक न्याय हि मुलतत्वे ही मी तथागत गौतम बुद्धाच्या विचारातूनच घेतली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेतच या मुल्याचा निर्देश केला आहे. डॉ. आंबेडकर राज्य घटना लिहीत असताना प्रबुद्ध भारताचे स्वप्न पाहत होते. बुद्धाच्या विचारातील लोकशाही मुल्यावर आधारलेला नवाभारत त्यांना अपेक्षित होता. ज्ञान म्हणजे प्रकाश हि गौतम बुद्धाची शिकवण डॉ. आंबेडकर यांनी प्रमाण मानली होती. हाच प्रकाश सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीचा आधार झाला पाहिजे यासाठीच त्यांचे प्रयत्न होते. डॉ. आंबेडकर लोकशाही बद्दल म्हणतात की लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात रक्ताचा थेंब न सांडता परिवर्तन घडऊन आणलं गेलं पाहिजे. समाजातील सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्याचे प्रामाणीक प्रयत्न झाले पाहिजे. लोकांचे प्रश्न लोकप्रतिनिधीनी सोडवले पाहिजे. कारण लोकशाहीत लोक हेच सर्वोच आहे. त्यांच्या विकासासाठी लोक प्रतिनिधीनी अहोरात्र झटले पाहिजे तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला नवा भारत निर्माण होऊ शकतो.
जय भारत जय संविधान….