नगर पंचायत निवडणूकी समोर संजय आत्राम यांचे निकटवर्ती युवकासहित शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश

56

अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी 9405855335

जिल्हा गडचिरोली : आज दिनांक २६/११/२०२१रोजी शिवसेना जन संपर्क कार्यालय अहेरी येथे संजय आत्राम व त्यांचे जवळचे निकटवर्ती युवकानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, रियाज शेख यांचा शुभ हस्ते शिवबंधन बांधून जाहिर प्रवेश केले. सुप्रसिध्द राजकारण आणि समाजकारनात सक्रिय असणारे आणि प्रभाग क्रमांक ०७ या प्रभागात मजबूत पकड असल्याने निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षाला एक मजबूत सक्षम दमदार नवनियुक्त शिवसैनिक तयार झाला अशी चर्चा अहेरी राजनगरित होत आहे. यावेळी शिवसेना जन संपर्क कार्यालय येथे सर्वप्रथम शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी संजय आत्राम यांना भगवा दुपट्टा टाकून स्वागत करून संजय आत्राम, रंजन कोडपे, आकाश सिळाम, राज कोडापे, दुलेश मैलारापावार, नागेश आत्राम, अभिषेक मादासावर, छत्रपती तलाडे, शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करून घेतले. *या प्रवेश कार्यक्रमात जिल्हा प्रमुख, रियाज शेख ,उप जिल्हा प्रमुख, अरुण धुरवे, ग्रामीण उप जिल्हा प्रमुख, बिरजू गेडाम, उप जिल्हा प्रमुख महिला आघाडी, पौर्णिमा ताई इस्ताम. यांचा मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक ०७ मधून संजय आत्राम यांची शिवसेना पक्षा कडून उमेदवारी जाहिर* केली .आणि शिवसेना अहेरी विधानसभा कडून यावेळी शुभेच्छा देण्यात आली.