संविधान दिन: हिंगणघाट येथे संविधान दिवस उत्साहवर्धक वातावरण साजरा.

✒प्रशांत जगताप ✒
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 9766445348 📲
हिंगणघाट,दि.26 नोव्हें:- संपुर्ण भारत देशात काल भारतिय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यात हिंगणघाट शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. 1949 मध्ये यादिवशी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. 26 जानेवारी 1950 पासून संविधान देशात लागू झाले. त्यामूळे संपुर्ण मानवजातीला न्याय, हक्क, अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क असे अनेक मुलभुत अधिकार मिळाले आहे. त्यामूळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ संविधानाची जन जागृती करण्याकरीता हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहवर्धक वातावरण साजरा करण्यात आला.
संविधान दिनाच्या अनुसंघाने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन गोरख भगत, कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जवादे, प्रमुख पाहुणे म्हणुन विजय आगलावे, किशोर खैरकार, नीरज गुजर, मोहन राईकवार, शारदा झामरे, महेद्र मुनेश्वर, विशाल मानकर, तुशाल उमाळे, विशाल रामटेके, मंगलाताई कांबळे, अरुण भगत, कुणाल वासेकर, राष्ट्रपाल मेश्राम, जितेद्र रामटेके हे उपस्थीत होते.
संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने संविधान सन्मान रैली सकाळी प्रलय तेलंग आणि मनोज वासेकर यांच्या संयोजनात काढण्यात आली. त्यानंतर संविधान प्रस्तावना वाचन अशोक भाले आणि रसपाल शेंदरे यांच्या संयोजनात झाले. रांगोळी स्पर्धा सीमा मेश्राम, राजश्री बंबोडे संयोजनात आयोजित करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा कार्यक्रम अस्मिता भगत, संध्या जगताप संयोजनात आयोजित करण्यात आला. डान्स स्पर्धाचे आयोजन अनुलाताई सोमकुवर, मृनालीनी धनविज यांचा संयोजनात आयोजित करण्यात आली. त्यानंतर रात्री संविधान बदल जागृतीसाठी कव्वालीचा कार्यक्रम परमानंद भारती याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल मून, आभार ललीत धनविज यांनी मानले. कार्यक्रमाला यसश्वी करण्यासाठी अजय डांगरे, प्रशांत मेश्राम, विक्रांत भगत, सुहास जिवनकर, निर्मला भोंगाडे, सुदेश कुत्तरमारे, पवन भगत यानी कार्य केले.