युवा स्वाभिमान पक्षा तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला

52

युवा स्वाभिमान पक्षा तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला

युवा स्वाभिमान पक्षा तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला
युवा स्वाभिमान पक्षा तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :-सविस्तर वृत्त असे की :- २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठी लोकशाही संविधानामुळेच जिवंत आहे. संविधान हा भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ आहे. देशाचे अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे.
स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, समतेचा हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क हे मूलभूत हक्क संविधानाने नागरिकांना
बहाल केले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणे,
संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, देशाचे सार्वभौमत्व कायम राखणे, देशाचे अखंडत्व कायम राखणे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे हे मूलभूत कर्तव्येही संविधानात दिली आहेत. आपल्या हक्कांसोबत आपल्या
कर्तव्याचीही जाणीव करून देणारी व जगातील सर्वात मोठे असणाऱ्या भारतीय संविधानाच्या निर्मितीचा आजचा विशेष अविस्मरणीय दिवस..
✊🏻💪🏻ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहले कि, त्याच पुस्तकावर आज हा 🇮🇳भारत देश🇮🇳 चालतो…. २६ नोव्हेंबर भारतीय 📖📖📖संविधान दिनाच्या निमित्त आज दिनांक:- २६/११/२०२१ ला युवा स्वाभिमान पक्ष चंद्रपूर तर्फे चंद्रपूर गोल बाजार येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस / पुतळ्या ला माल्यार्पण करून तथा कॅन्डल्स लावून संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळेस युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व युवा स्वाभिमान परिवारातील राहुल चव्हाण,प्रियांशु सलामे, आशु सलामे, नयन मडावी, आशिक कोवे, अतुल कुरसंगे, ऋषिकेश मिसार, पवन निकुरे, प्रतीक गोडे,महेश तावाडे, रोहित सिंग आदी सदस्य उपस्थित होते.