संविधानामुळे देशाची एकात्मता व अखंडता सुरक्षित – पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील*
*संविधान जागर रॅलीत विविध संघटना झाल्या सहभागी

*संविधान जागर रॅलीत विविध संघटना झाल्या सहभागी
जळगांव प्रतिनिधी: खंडू महाले मो.७७९६२९६४८०
जळगाव :- हजारो जाती,धर्म,पंथ,भाषा,प्रांत व भिन्न संस्कृती असलेल्या भारताची एकात्मता व अखंडता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे सुरक्षित आहे असे विचार पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.संविधान दिनानिमित्त संविधान जागर समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.*
*कार्यक्रमाच्या सुरुवातीस रेल्वे स्थानकाजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.यानंतर संविधान गौरव सभा घेण्यात आली.* *पालकमंत्र्यानी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून सर्वांना राष्ट्रनिष्ठेची शपथ दिली.यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या दमदार व प्रभावी भाषणातून संविधानाचा गौरव करताना सांगितले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे भेदाभेद व विषमता नष्ट करून प्रत्येक नागरिकाला समता व स्वातंत्र्य बहाल केले.यामुळेच माझ्या सारखा सामान्य कुटुंबातला माणूस मंत्री होऊ शकला.*
*संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी प्रास्ताविक करताना* *संविधानातील प्रस्तावनेतील आशय हा नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकारांचा गाभा आहे असे सांगून संविधान धर्मनिरपेक्ष असल्याने प्रत्येक भारतीयांना आपापल्या विचारांची उपासना करण्याचे स्वातंत्र्य मिळाले असे प्रतिपादन केले.*
*यावेळी उपस्थित मान्यवरांना पैं. हाजी गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ संविधानाच्या प्रती देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात एजाज* *मलिक,डॉ.करीम सालार यांनीही आपले विचार मांडले.याप्रसंगी महापौर जयश्री महाजन,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील,महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी,मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील,सुरेश पाटील,फारुख शेख,माजी महापौर सीमा भोळे,मुकुंद नन्नवरे, काँग्रसचे महानगर अध्यक्ष श्याम तायडे* *आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे तर आभार भारत ससाणे यांनी मानले.*
*यांनतर निघालेल्या संविधान जागर रॅलीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला.रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नेहरू चौक मार्गे टॉवर चौक, चित्रा चौक कडून शिवतीर्थ मैदानावर* *आली.याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली ची सांगता करण्यात आली.*
*रॅलीत संविधान जागर समितीचे मुकुंद* *सपकाळे,डॉ.करीम सालार,भारत ससाणे, एजाज मलिक,अमोल कोल्हे,सचिन धांडे, अय्याज अली, दिलीप सपकाळे,नगरसेवक सुरेश सोनवणे, हरिश्चंद्र सोनवणे, खुशाल चव्हाण,माजी नगरसेवक सुनील माळी,प्रा.डॉ.फिरदौस सिद्दीकी,प्रा.शबाना* *खाटीक,प्रा.डॉ.प्रकाश कांबळे,डॉ.मिलिंद बागुल,प्रा.डॉ.सत्यजित साळवे,प्रा.चंद्रमणी लभाणे,नीलेश बोरा,हरीश कुमावत, रंजना तायडे,नीलू इंगळे,भरती म्हस्के,कविता सपकाळे,विमल मोरे,विवेक ठाकरे,ईश्वर मोरे,सुरेश अंभोरे,भारत सोनवणे, समाधान सोनवणे,जगदीश* *सपकाळे,सचिन बिऱ्हाडे, विजयकुमार मौर्य,राम पवार,खुशाल चव्हाण,माजी नगरसेवक राजू मोरे,नितीन चौधरी,किरण ठाकुर,युवराज सुरवाडे,राधे शिरसाठ,पिंटू तायडे,मिलिंद तायडे,पांडुरंग बाविस्कर, आकाश सपकाळे आदी सहभागी झाले होते.*
*रॅलीत संविधान जागर समिती,मौलाना आझाद विचार मंच,छावा मराठा युवा महासंघ, मणियार बिरादरी,प्रहार जनशक्ती,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड आदी संघटना सहभागी झाले होते.*