वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा.

50

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442📲

काटोल,दि.26 नोव्हे:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान देशाच्या स्वाधीन केले, तो दिवस संविधान दिवस म्हणून संपुर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने काटोल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याजवळ संविधान दिनाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे काटोल तालुका अध्यक्ष जानरावजी गावंडे तर प्रमुख उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष तथा नगर पालिकेचे माजी सभापती दिगांबर डोंगरे, प्रा. विरेंद्र इंगळे, नरखेड तालुका प्रभारी डॉ. सुनिल नारनवरे, प्रा. प्रभाकर मेश्राम, काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे, सुरेशराव देशभ्रतार, महिला आघाडीच्या अध्यक्षा मिनाताई पाटील, युवा नेते श्रीकांत गौरखेडे, लेखिका व प्रसिद्ध कवयत्री सरिता रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आले व दिगांबर डोंगरे यांनी उपस्थितांना संविधान ग्रंथाच्या मूळ उद्देशीकेचे वाचन करून संविधानानुसार प्रत्येकानी जिवनात अनुकरण करण्याची शपथ ग्रहण केली.

यावेळेस संविधान दिन चीरायु होवो, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय लोकशाहीचा विजय असो, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देवून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर सुरेशराव देशभ्रतार, रामराव पाटील, सिद्धार्थ वाहने, बळवंत नारनवरे, प्रा. विरेंद्र इंगळे, डॉ. सुनिल नारनवरे, गुलाबराव शेंडे, सुधाकर कावळे, सरिता रामटेके, मिना पाटील, जानरावजी गावंडे, यांनी संविधानावर आपले विचार व्यक्त केले. तर मुख्य मार्गदर्शन करताना दिगांबर डोंगरे म्हणाले की भारतात विविध जाती धर्माचे पंताचे लोक राहतात त्यांची भाषा, राहणीमान, संस्कृती, चालीरीती वेगवेगळ्या आहेत पण आपण सर्वजन प्रथम भारतीय आहोत व आम्ही सर्व भारतीय एक आहोत या सर्वाना सामाजिक समत्येच्या एकतेच्या धागेत बांधुन ठेवण्याची किमया संविधानाने केली. संविधानानीच सर्वाना अधिकार व हक्क बहाल करून जिवन जगण्याच्या मार्ग दाखवला व संविधानाने भारतीयांना सार्वभौम लोकशाही देवून देश एकसंघ ठेवण्याचे महान कार्य केले. आज देशात संविधान दिन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करून संविधानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा मान वाढविला तेव्हा प्रत्येक आंबेडकरी अनुयायांनी आपापल्या वस्तीत आठवड्यातून एक दिवस संविधानाच्या ग्रंथाचे वाचन करून संविधानाची माहिती द्यावी व सरकारनी शाळा, कॉलेज अभासक्रमात संविधानाचा एक विषय अनिवार्य करून येणाऱ्या पिढीला संविधानाची माहिती करून द्यावी अशा प्रकारचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन युवा नेते श्रीकांत गौरखेडे यांनी तर प्रास्ताविक नीळकंठ गजभिये यांनी तर आभार विनोद देशभ्रतार यांनी मानले.

कार्यक्रमाला तुकाराम देशभ्रतार, दिगांबर भगत, सुनिल फाटे, कविता मडके, मनोज गायकवाड, श्रीकृष्ण ढोके, असलम शेख, ओंकार मलवे, नेतराम सोमकुवर, सिद्धार्थ कुकडे, प्रकाश निस्वादे, घनश्याम फुले, नितीन डबरासे, मनिष रक्षित यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.