मागेल त्याला सौर उर्जा कुंपन योजनेचा लाभ शेतकर्‍यांना देण्याची शिवसेनेची मागणी

56

मागेल त्याला सौर उर्जा कुंपन योजनेचा लाभ शेतकर्‍यांना देण्याची शिवसेनेची मागणी

मागेल त्याला सौर उर्जा कुंपन योजनेचा लाभ शेतकर्‍यांना देण्याची शिवसेनेची मागणी
मागेल त्याला सौर उर्जा कुंपन योजनेचा लाभ शेतकर्‍यांना देण्याची शिवसेनेची मागणी

ब्रम्हपुरी प्रतिनिधी:- राहुल भोयर मो 9421815114

ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडेगावातील ग्रामस्थांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकरी हे वर्षभर शेतामध्ये विविध पिकांची लागवड करूनआपला उदरनिर्वाह करतात. शेतात खरीप तसेच रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. त्यामुळे शेतातील उत्पादित माल जंगली प्राण्यांना खावयास मिळत असल्याने, जंगली प्राण्यांचा वावर ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतशिवारात पहावयास मिळत आहे. परिणामी, शेतातील रब्बी व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यात प्रामुख्याने रानटी डुक्कर, बंदरे, व इतर प्राण्यांचा समावेश आहे.
कृषी पंपाद्वारे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. त्यामुळे अनेकदा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय शेतातील रब्बी पिके मुंग, उदीड, बरबटी, सोयाबीन व नगदी पिक भाजीपाला आदी. पिकांची जंगली प्राण्यांनी नुकसान केले आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी हवालदिल बनत चालला आहे. जंगली वन्य प्राण्यांच्या शेतातील नुकसानीत ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगांव, लाडज, सोंदरी, चिखलगांव, हरदोली, सावलगांव, माहेर, चिंचोली, सुरबोडी, कोथुळना, नवेगांव, परसोडी, झिलबोडी, उदापूर, मालडोंगरी, पारडगांव, बेटाळा, चौगान, तोरगांव खुर्द, तोरगांव बुज.,सोनेगावं, बोढेगाव, नान्होरी, अर्‍हेर, भालेश्वर, दिघोरी, देऊळगांव, बेलगांव व कोलारी आदीं़ पिंपळगांव-मालडोंगरी व अर्‍हेरनवरगांव-नान्होरी, तसेच खेडमक्ता-चौगान जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचा समावेश आहे.
त्यामुळे शेतमालाची होणार्‍या नुकसानी पासून व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी शासनाने मागेल त्याला सौर उर्जा कुंपन योजनेचा लाभ देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्त्वात उपवनरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर वनविभाग कार्यालय, ब्रम्हपुरी यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी डॉ.रामेश्वर राखडे उपतालुका प्रमुख, केवळराम पारधी सरपंच सोंदरी तथा उपतालुका प्रमुख ब्रम्हपुरी, शामराव भानारकर माजी शहरप्रमुख ब्रम्हपुरी, गुलाब बागडे विभागप्रमुख खेडमक्ता-चौगान जि.प.क्षेत्र, भाष्करराव टिकले,प्रभाकर दोनाडकर, हेमराज राऊत, संजय ढोरे, देवदास ठाकरे, रामचंद्र मैंद आदीं व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.