मुंबईच्या कुर्ल्यात 20 वर्षीय तरुणीची बलात्कार केल्या नंतर निर्मम हत्या.

✒️मुंबई महानगर प्रतिनिधी✒️
मुंबई:- मुंबईच्या कुर्ला परिसरातुन एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कुर्ला परीसरात एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्या नंतर तिची निर्मम हत्या केल्याच्या घटनेने मुंबई हादळली आहे. त्यामूळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कुर्ला भागातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद बिल्डींगच्या टेरेसवर एक तरुणी मृतावस्थेत आढळली होती. इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना या युवतीचा मृतदेह सर्वप्रथम आढळल्याची माहिती आहे.
कुर्ल्यातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ही घटना कधी घडली, पीडित तरुणी नेमकी कोण आहे, तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी कोण आहेत, याविषयी अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
प्राप्त माहितीनुसार एचडीआयएल कंपाऊडमधील ही इमारत बंद असते. मात्र 18 वर्षांचा एक तरुण आपल्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी या इमारतीमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने सर्वात आधी तरुणीचा मृतदेह पाहिल्याची माहिती आहे.
तरुणीच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या त्यामूळे घाबरलेल्या अवस्थेत तरुणाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सर्वप्रथम या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. तरुणीच्या डोक्यावर गंभीर जखमा असून घटनास्थळाचा पोलीस पंचनामा करत आहेत. एचडीआयएल कॉलनीमध्ये परिसरातील झोपडपट्टीवासियांचे नुकतेच पुनर्वसन करण्यात आले आहे.