शिवसैनिक ठरवणार राजुरा तालुक्यातील भविष्यातील निवडणुकीचा निकाल : शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे

56

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण प्रतिनीधी
8378848427

राजुरा,दी.28 नोव्हें:- राजुरा येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी अध्यक्षीय भाषण केले, राजुरा विधानसभा ही ऐके काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता परंतु मध्यंतरी काळात राजुरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेत दुफळी निर्माण झाली परंतु ती दुफळी आता संपूर्ण बाजूला ठेवून आजी माजी पदाधिकारी यांनी मिळून पक्षासाठी काम करून संपूर्ण तालुक्यात शिवसेनेच्या शाखा स्थापित करून संपूर्ण ग्रामीण भागात आणि शहरात शिवसैनिक तयार करण्याचे आदेश दिले.

येणाऱ्या निवडणुका ह्या सामान्य शिवसैनिकांच्या निवडणुका आहे जे आता पदाधिकारी आहेत त्यांच्या कडून कोणतीही हलगर्जीपणा सहन करून घेणार नाही जर पदाधिकारी आपल्या पदाला न्याय देऊ शकत नसेल तर स्वतः समोर येऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊन नवीन व्यक्तींना पदाधिकारी नेमून मार्गदर्शन करावे.
भविष्यात येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये निकाल चांगले येतील आणि शिवसेनेच्या बालेकिल्ला अभेद राहील.

या मेळाव्याला राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, कुसुमताई उदार माजी जिल्हा संघटिका महीला आघाडी, वासुदेव चापले राजुरा तालुका प्रमुख शिवसेना, बल्लारपूर तालुका समनवयक प्रदीप गेडाम, स्वप्नील काशीकर,प्रदिप येनुरकर तालुका समन्वयक राजुरा शहर प्रमुख निलेश गंपावार, रमेश झाडे ़ऊपतालुका प्रमुख बंटी मालेकर
युवासेना तालुका प्रमुख शहर समन्वयक बबलू चौहान आणि आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.