संविधान दिवस: बल्लारपूर येथील मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय मध्ये संविधान दिन साजरा.

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मो 9764268694
बल्लारपूर,दि. 26नोव्हें:- ला मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालय, बल्लारपूर येथे “संविधान दिवस” साजरा करण्यात आला त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या प्राचार्या सौ. कोतकेलवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. सौ. आमटे व सौ. किसान यांनी संविधान बद्दल सविस्तर माहिती दिली तसेच उपमुख्याध्यापिका सौ. ढेगळे मार्गदर्शनपर भाषण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. कोतकेलवार यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन अध्यक्षीय भाषन केले. विद्यार्थी व शिक्षिकांनी विविध स्पर्धा मधे उत्स्फूर्त सहभाग घेतला. निबंध स्पर्धा 1) कु. सना खान 2) कु. चित्ररेखा गोंधळी 3) कु. तम्मन्ना खान भाषण स्पर्धा 1) कु. अनुष्का ठाकुर 2) कु. अस्मिता चौव्हाण 3) कु. नैना निषाद
पोस्टर स्पर्धा 1) कु. भुमिका कैथवास 2) कु. जुबी पठाण तसेच स. शिक्षिका कु. नजमा अहमद शेख यांनी सुंदर पोस्टर बनवले. संचालन व आभार प्रदर्शन कु. ज्योती ताजने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या पर्यवेक्षिका रच्चावार, मिडल इन्चार्ज सौ. बोप्पनवार कु. विमल पून सर्व शिक्षिका व इतर कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.