भाईंदरमध्ये फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला, ठाण्याची पुनरावृत्ती.

✒मुंबई महानगर प्रतिनिधी✒
मुंबई:- मुंबईच्या मिरा – भाईंदरमधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामूळे मुंबई महानगर पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. मिरा – भाईंदर येथे परत ठाण्याची अधिका-यावर हल्याची पुनरावृत्ती बघायला मिळाली आहे. इथे अनअधिकृ फेरीवाल्यावर कारवाई करण्यास गेलेल्या एका अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत अधिकाऱ्याला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या 30 ऑगस्टला ठाणे महापालिकेतील माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली होती ही घटना ताजी असतांना मुंबईच्या भाईंदर पश्चिम बॉम्बे मार्केटजवळ रस्त्यावर बसत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्याकरिता एक पथक गेले होते त्यातील अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या फेरीवाल्याने चक्क लोखंडी रॉडने अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अधिकाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली.
भाईंदर पश्चिम येथील बॉम्बे मार्केट रस्त्यावर मोठ्या संख्येने फेरीवाले बसत अससतात. त्यामुळे रविवारी संध्याकाळी फेरीवाले पथक त्या ठिकाणी दाखल झाले. पथकाला पाहून त्या ठिकाणी उपस्थितीत फेरीवाले संतप्त झाले आणि चक्क एका फेरीवाल्याने कारवाईचा विरोध करत फेरीवाले पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या हातावर लोखंडी रॉडने वार केला. यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेकरीता सुरक्षा दल कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. या संदर्भात तक्रारदार पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांनी दिली.
कल्पिता पिंपळे यांची बोटं कापली
गेल्या 30 ऑगस्टला ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.