विद्यार्थ्यांचा असाही प्रामाणिकपणा, मंगळसूत्र केले परत…….

57

विद्यार्थ्यांचा असाही प्रामाणिकपणा, मंगळसूत्र केले परत…….

विद्यार्थ्यांचा असाही प्रामाणिकपणा, मंगळसूत्र केले परत.......
विद्यार्थ्यांचा असाही प्रामाणिकपणा, मंगळसूत्र केले परत…….

✒अरूण भोले ✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – सध्याच्या स्वार्थी युगात प्रामाणिकपणा हा क्वचितच पाहायला मिळतो मात्र कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महा.तील विद्यार्थी ओमकार सुरेश नवघडे,मयूर पिसे,राज श्रीरामे,संकेत रंधये,साहिल ठाकरे,अर्पित जांभुले, राकेश दोहींतरे वर्ग 9 वी हे मधल्या सुट्टीत विद्यालयाबाहेर पडले आणि समोरच्या गल्लीत फिरत असताना त्यांना प्लास्टिक ची पिशवी दिसली..आणि कुतूहलाने त्यांनी ती उचलली आणि बघतात तर त्यात चक्क मंगळसूत्र. लगेच त्यांनी विद्यालयातील शिक्षक श्री.प्रमोद दिघोरे व श्री.स्वप्नील नवघडे सर,पिसे सर,नरुले सर यांना त्यांनी ती पिशवी सुपूर्द केली.संबंधित शिक्षकांनी ही बाब विद्यालयाच्या सुट्टीनंतर विद्यालयाचे प्राचार्य सन्मा.देवीदासजी चिलबुले यांना सांगितली आणि त्या पिशवी मध्ये असलेल्या गहान पावती वरील नावावरून शोधाशोध सुरू झाली. विविध पतसंस्था ,सावकार यांना विचारणा करण्यात आली मात्र त्या व्यक्तीचा शोध लागू शकला नाही.या वरच न थांबता चिठ्ठीतील नावावरून विविध गावात त्या व्यक्तीबाबत विचारणा केली आणि शेवटी ती व्यक्ती नागभीड मधील दुर्गम भागात असलेल्या कोरंभी या गावातील असल्याचे कळले व त्यांना निरोप पोहचवून त्यांची वस्तू घेऊन जाण्याचे कळविण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थ्यासमक्ष त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रमाणिकपणाची शाबासकी देत त्यांच कौतुक करण्यात आलं.व संबंधित महिलेची ओळख पटवून विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका सौ.कुंदाताई गिरडे मॅडम यांच्या हस्ते सौ.अनिता सुधाकर जुगनाके मु.कोरंभी या महिलेला तिचे मंगळसूत्र सुपुर्द करण्यात आले.त्यावेळी मात्र ती महिला भावविवश झाल्याने तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघडत होते.
आजच्या या आधुनिक युगात सारं काही पैशाने विकत घेता येत असं समज असला तरी प्रामाणिकपणा व प्रमाणिकतेचे संस्कार रुजावं लागते.त्या मुलांच्या आई वडिलांनी केलेले संस्कार व त्यांच्या शिक्षकांनी दिलेली शिकवण याचाच परिपाक म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा.या प्रमाणिकतेला तोड नाही.हे या विद्यार्थ्यांच्या कृतीतून सिद्ध झाले. विद्यार्थ्यांनी दर्शविलेल्या प्रमाणिकतेसाठी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य,पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, कर्मचारी तथा विद्यार्थी यांच्याकडून प्रशंशा करण्यात आली.व समाजातील विविध घटकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.