मोरारजी टेक्सस्टाॅयल कंपनीच्या
दोन हजार कामगारांचे काम बंद आंदोलन!

दोन हजार कामगारांचे काम बंद आंदोलन!
देवेंद्र सिरसाट.
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर.
9822917104.
आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहतीत असलेल्या बुट्टी बोरी येथील मोरारजी टेक्सस्टाॅयल कंपनीच्या अस्थाई कामगारांनी सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे, दोन हजारावर महिला पुरुष कामगार कारखाण्या बाहेर धरणे आंदोलनावर बसले आहेत, कामगारांच्या मागण्या आहेत की आम्हाला ठेकेदारी पद्धतीनं काम नको तर कंपनी व्येवस्थापनाने आम्हाला नियमित करुन घ्यावे.ठेकेदार हा अर्ध्या पगारात कामगारांची पिळवणूक करीत आहे, कामगार राज्य मंत्री बच्चू कडू यांनी कंपनी व्येवस्थापन व कामगार प्रतिनिधिचा समन्वय घडवून आणला होता परंतु ठेकेदार हे मोठे राजकीय नेते असल्याने, कंपनी व्येवस्थापन त्यांच्याच इशाऱ्यावर वागत असून,20 / 20 वर्षांपासून कमं करणाऱ्या कामगारांची मात्र आर्थिक पिळवणूकीसह शारिरिक आणि मानसिक शोषण होत आहे.जो पर्यंत कंपनी व्येवस्थापन आमच्या मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत आमचे कामबंद आंदोलन चालुच राहणार असे कामगारांचे म्हणने आहे.