“ब्रम्हाकुमारीज” ब्रम्हपुरीद्वारे संगीतसंध्या कार्यक्रम संपन्न

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500
ब्रम्हपुरी:-प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ब्रम्हपुरी च्या सौजन्याने स्वागत मंगल कार्यालय येथे आध्यात्मीक गीताने सुसज्जीत असा संगीत संध्या कार्यक्रम सकाळी 11 ते 2 व संध्याकाळी 5 ते 7 अशा दोन सत्रात संपन्न झाला…
प्रस्तुत कार्यक्रमासाठी राजयोगी ब्रम्हाकुमार आदरणीय युगरतन भाईजी माउंट आबू राजस्थान) यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सुभाषजी बजाज माजी प्राचार्य व अध्यक्ष जेष्ठ नागरीक संघटना ब्रम्हपुरी हे लाभले होते. त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणातुन शांती हा आपला स्वधर्म आहे. व ब्रम्हाकुमार
यांचा ओमशांती हा महामंत्र असुन संपूर्ण जगात शांतीचे साम्राज्य आणण्याचे महत्वपूर्ण कार्य संस्था करते आहे. असे आशिर्वाचन प्रकट केले. व युगरतन भाईजीना त्याच्या अतुलनीय गायनाबाबद भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री हरीशचंद्र चोले यांचे अनमोल
मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे लाभल्या होत्या. त्यानी ही ब्रम्हाकुमारीजच्या विश्व सेवेबद्दल आर्शिवचन प्रकट केले. व सामाजीक उन्नती करणारी एकमेव संस्था ” म्हणून संस्थेचा गौरव केला. या कार्यक्रमासाठी ब्रम्हाकुमारीन गडचिरोलीच्या संचालिका “ब्रम्हाकुमारी नलिनीदीदी, ब्रम्हाकुमारीज वणी व चंद्रपुरच्या संचालीका ब्र.कु. कुंदा दीदी व ब्र. कु. राजयोगीनी कुसुम दिदी, मिनल दिदी यांचे योगदान व आशिर्वाचनब शुभेच्छा लाभल्या, कार्यक्रमाचे यशस्वी संचालन ब. कु. मिनल दिदी संचालिका ब्रम्हपुरी यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्याचे संचालन ब्र. कु. राजूभाई गडाचरोली यांनी पार पाडले.
प्रस्तुत कार्यक्रमाचा उद्देशच ब्रम्हपुरी शहरातील सर्व जनतेला आध्यात्मीक उन्नतीसाठी भारताचा प्राचीन राजयोग कसा सहजरित्या शिकता येतो व तो शिकविला जातो ब्रम्हाकुमारीज च्या माध्यमालुन. सर्व जनतेने हा सहज राजयोग शिकून जीवन तनावमुक्त कसे बनवू शकतो याबाबत गीतांच्या माध्यमातून सहजपणे समजावून सांगीतले सतत दोन तास गीतांच्या सुरम्य माध्यमातून येणाऱ्या स्वर्णिम भारताचे चित्र रेखाटले गेले. तसेच स्वागतनृत्य, स्वर्णिम युगदर्शन व समारोपीय नृत्यांमध्ये कु. भुवनेश्वरी नवखरे व पूर्वश्री जिसकाटे तसेच छोट्या छोट्या पन्यांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रेखा नवखरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्र. कु. रितेशभाई, नरेंद्र भाई, विजयभाई, दयालभाई सुनीलभाई प्रफुलभाई मनोहरभाई, क्रिष्णाभाई, प्रदीपभाई व ब्रम्हाकुमारीज परीवारातील सर्व बंधू भगिनीच सहकार्य लाभले.