भारतात ओमिक्रॉनने बांधीत एकही रुग्ण नाही, लॉकडाऊनचे निर्बंध लादण्याचा कोणताही निर्णय नाही: राजेश टोपे

✒️ मुकेश चौधरी ✒️
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
📲 7507130263 📲
महाराष्ट्र:- ओमिक्रॉन वायरस बदल सध्या देशात आणि राज्यात भितीचे वातावरण निर्मान करण्यात येत आहे. परत लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचे सोशल मिडियाच्या मध्यमातुन चर्चा सुरु झाली आहे. त्यामूळे सर्व सामान्य नागरीकाच्या भितीचे वातावरण निर्मान झाले आहे.
त्यामूळे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना अशी माहिती दिली की, सध्या भारतात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
आपल्या देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार डेंजर आहे हे सिद्धही झालं नाही. मी अभ्यास करून माहिती देत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. जे उद्योगधंदे सुरू आहेत. ते तसेच सुरू राहितील. त्यात काही बदल केला जाणार नाही. शिवाय येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझं याबाबत बोलणंही झालं आहे, असं टोपे यांनी सांगतिलं.
कोरोना वायरसचे नियम पाळा.
पुढील संभाव्य धोक्यापासून वाचायचं असेल तर आज काय करावं तर कोरोना वायरसचे असलेले नियम पाळले पाहिजेत. अजून काही प्रोटोकॉल असतील तर जागतिक आरोग्य संघटना त्याबाबतचे निर्देश देईल. त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.