चंद्रपुर: वनहक्क दाव्यावर पुनर्विचार करावा; पाच आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली अपील.

54

चंद्रपुर: वनहक्क दाव्यावर पुनर्विचार करावा; पाच आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली अपील.

● गुगल अर्थ सॅटलाईट इमेज मध्ये अतिक्रमण आढळून न आल्याचे कारण देत आदिवासीचे वनहक्क दावे जिल्हाधिकारी यांनी नामंजूर केले.

● गरीब शेतकरी आदिवासींवर कोसळले संकट.

चंद्रपुर: वनहक्क दाव्यावर पुनर्विचार करावा; पाच आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली अपील.
चंद्रपुर: वनहक्क दाव्यावर पुनर्विचार करावा; पाच आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली अपील.

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो 9923497800

चंद्रपुर:- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की, आज दिनांक 30 नोव्हेंबरला वनहक्क दाव्यावर पुनर्विचार करावा अशी अपील पाच आदिवासींनी जिल्हाधिकारी चंद्रपुर कार्यालयात दाखल केली.

गुगल अर्थ सॅटलाईट इमेज मध्ये अतिक्रमण आढळून न आल्याचे कारण देत जिवती तालुक्यातील काकबन येथील भुजंगराव कोटणाके, दौलतराव कोटणाके, लच्चू कोटणाके, लक्ष्मण कोटणाके, सुरेश कोटणाके, इत्यादींचे वनहक्क दावे जिल्हाधिकारी यांनी नामंजूर केले. यामुळे फार मोठा संकट आदिवासींवर कोसळले आहे.

चंद्रपुर: वनहक्क दाव्यावर पुनर्विचार करावा; पाच आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली अपील.

सदर आदिवासी बांधवांचे नाव साजा नगराला येथे नमुना एक ई च्या रजिस्टरला 1999 ते 2000 पासून अतिक्रमण असल्याची नोंद आहे. तसेच विभागीय समितीने सुद्धा सदर आदिवासींचे दावे मंजूर केले असताना केवळ गुगल अर्थ सॅटलाईट इमेज मध्ये अतिक्रमण आढळून आले नसल्याचे कारण देत पेसा क्षेत्रातील आदिवासींचे वनहक्क दावे नामंजूर करणे हा आदिवासी बांधवांवर अन्याय असून जिल्हास्तरीय समितीने पुनर्विचार करून वनहक्क दावा मंजूर करावा असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष घनश्याम मेश्राम यांनी व्यक्त केले आहे.

सदर प्रकरणात आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांची ही भेट घेऊन माहिती देण्यात आली.