उन्हाळी धान पिक लागवडीसाठी गोसीखुर्द धरणाचे पाणी द्या*
ताॆरगांव खुर्द यॆथील शॆतकर्या़ची मागणी

ताॆरगांव खुर्द यॆथील शॆतकर्या़ची मागणी
✒क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500
ब्रम्हपुरी :
_उन्हाळी पिक लागवड करण्याकरिता गोसीखुर्द धरणाचे पाणी बी १ कालव्या अंतर्गत तोरगाव खुर्द येथील शेत शिवारात सोडण्यात यावे या मागणीकरिता कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द प्रकल्प वाही, उपविभागीय अभियंता, गोसेखुर्द धरण उपविभाग नागभीड, आपत्ती व्यवस्थापन,बहुजन कल्यान मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचॆ पालकमंत्री विजय वडॆट्टीवार व आमदार बंटी भांगडीया यांना ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द येथील शेतकऱ्यांनी निवेदन प्रेषित केले._
_यंदाच्या खरीप हंगामात तोरगाव खुर्द येथील शेत शिवारात धानपिकावर तुडतुळा, पेरवा आदी रोगांनी थैमान घातला होता. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेले घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. परिणामी बँका, सेवा सहकारी संस्थेतून घेतलेले कर्ज फेडावे कसे असा यक्ष प्रश्न त्याच्या समोर आवासून उभा आहे. त्यामुळे खरीप हंगामात झालेली नुकसान भरपाई उन्हाळी पिकाच्या लागवडीतून निघेल या आशेत शेतकरी आहे. त्यामुळे उन्हाळी पिक लागवड करण्याकरिता गोसीखुर्द धरणाचे पाणी बी १ कालव्या अंतर्गत तोरगाव खुर्द येथील शेत शिवारात सोडण्यात यावे, पाणी मिळाल्यास अंदाजे ३८१ हेक्टर शेतजमीन ओलीताखाली येईल व शेतकऱ्यांना उन्हाळी धानपिक लागवड करण्यास मदत होईल._
_प्रशासनाला वारंवार पाणी मिळण्याविषयी मागणी करूनही अजुनपर्यंत तोरगांव खुर्द ला उन्हाळी धानपिक लागवडी करीता कालव्याचे पाणी मिळालेले नाही. जवळील तोरगावं बृज, मौशी या गावांना उन्हाळी पिका करीता पाणी देण्यात येते. हे एक प्रकारचे तोरगाव खुर्द येथील शेतकऱ्यांवर अन्याय केल्या सारखे होत आहे. तोरगाव खुर्द येथील शेतकरी यांना उन्हाळी धान फसल करीता गोसेखुर्द कालव्याचे पाणी द्यावे या मागणीसाठी कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द प्रकल्प वाही, उपविभागीय अभियंता, गोसेखुर्द धरण उपविभाग नागभीड, आपत्ती व्यवस्थापन,बहुजन कल्यान मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचॆ पालकमंत्री विजय वडॆट्टीवार व आमदार बंटी भांगडीया यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तोरगांव खुर्द येथील शेतकरी गोपीचंद बेद्रे, सुधाकर राऊत ,सुनील राऊत ,मुरलीधर मिसार, गुरुदेव पारधी ,शालिक अलोने, राजेश्वर अलोने, रामहरी बुल्ले ,संजय नखाते ,श्रीकांत कोरडे, वाल्मीक गोठे, सचिन माकडे, आत्माराम बुल्ले, शरद कुथे , भगवान तोंडरे नितेश गोठे, व इतर शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते._