डॉ. बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर आम्ही जाणारच: आनंदराज आंबेडकर

✒प्रशांत जगताप ✒
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
📲9766445348📲
मुंबई:- राज्यात कोरोना वायरसच्या नविन ओमिक्रॉन वायरसच्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या वर्षीपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर होणा-या कुठल्याही कार्यक्रमास परवानगी दिली नाही. तसेच दादर चौपाटीवर असलेल्या देशातील कोरोडो लोकांचे प्रेरणास्थान चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहनही शासनाने केलं आहे. मात्र, शासनाचे हे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी धुडकावून लावलं आहे.
रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र शासना दिलेला इशारात आंबेडकरी समाज हा मृत्यूला कधीही भ्यायलेला नाही, असे ठणकावून सांगतानाच येत्या सोमवारी 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर जाणारच, अशी घोषणा आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे.
आनंदराज आंबेडकर यांनी एक चित्रफितीच्या मध्यमातुन शासनाचे हे आवाहन धुडकावून लावतानाच आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्याचं आवाहनही केलं आहे. तसेच आंबेडकरांच्या दर्शनासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकासाठी निर्णायक आंदोलन करून त्यांनी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारला भीम टोल्याची प्रचिती दिलेली आहे. त्यामुळे 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर येण्यासाठी त्यांनी बौद्ध जनतेला केलेल्या आवाहनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
महापरिनिर्वाण दिनीच कोरोना कसा येतो?
इतर धर्मीयाचे सर्व सण, उत्सव, राजकीय पक्षांचे सारे कार्यक्रम पुन्हा सुरू झाले असून ते सुरळीत पार पडत आहेत. मग बौद्ध जनतेचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाण दिनीच कोरोनाचे नवे अवतार कसे उभे ठाकतात? असा सवाल आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला विचारला आहे. राज्य सरकारने घरात बसून बाबासाहेबांना अभिवादन करावे असे फक्त आवाहन केले आहे. पण आंबेडकरी समाज हा बंदी- मज्जावाला कधीही जुमानत नाही, हे त्यांनी पक्के लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.