हिंगणघाट जनतेच्या मागणी वरूण लक्ष्मी टॉकिज येथे जयंती चित्रपट लावा रवी कांबळे यांची मागणी.

66

हिंगणघाट जनतेच्या मागणी वरूण लक्ष्मी टॉकिज येथे जयंती चित्रपट लावा रवी कांबळे यांची मागणी.

हिंगणघाट जनतेच्या मागणी वरूण लक्ष्मी टॉकिज येथे जयंती चित्रपट लावा रवी कांबळे यांची मागणी.
हिंगणघाट जनतेच्या मागणी वरूण लक्ष्मी टॉकिज येथे जयंती चित्रपट लावा रवी कांबळ

✒️आशिष अंबादे ✒️
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट:- नुसताच प्रदर्शित झालेला मराठी सुपरहीट चित्रपट जयंती ला मिळत असलेली लोकप्रियता, त्यात असलेला सामाजिक संदेश त्यामूळे प्रत्येक गावातील चित्रपट गृहात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी लोकांची मोठी मागणी दिसून येत आहे.

हिंगणघाट शहरातील जनतेची अशी मागणी होती की, शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी टॉकिजमध्ये जयंती या चित्रपट प्रदर्शित करावा. हिंगणघाट शहरातील जनतेची मागणी बघून सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ कांबळे आणि इतर कार्यकर्त्यानी अविनाश नवरखेडे, आशिष मंडलवार, अखिल धाबर्डे, भ्रमर रघाटाटे यानी लक्ष्मी टॉकिजच्या व्यवस्थापक मंडळा बरोबर याबाबत चर्चा करून हिंगणघाट शहरातील जनतेची असलेली मागणी जयंती चित्रपट लावण्या संदर्भात चर्चा झाली.

रवीभाऊ कांबळे आणि इतर कार्यकर्ताचा चर्चेअंती लक्ष्मी टॉकिजच्या व्यवस्थापन मंडळाकडुन सकारात्मक संकेत देण्यात आले. एक डिसेंबर पासुन लक्ष्मी टॉकिज या चित्रपट गृहामध्ये सायंकाळी 6 ते 9 दरम्यानचा शोमध्ये जयंती चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या चळवळीवर चित्रीत करण्यात आलेला हा चित्रपट असून आपण सर्वानी जयंती हा चित्रपट आपल्या सहपरिवार सोबत आपल्या मित्रासोबत बघावा असे आव्हान रविभाऊ कांबळे यांनी केले.