देसाईगंज तालुक्यातील शेतशिवारात जंगली हत्तीचा हैदोस*
मोठ्या प्रमाणात धान व अन्य पिकांची केली नुकसान

मोठ्या प्रमाणात धान व अन्य पिकांची केली नुकसान
✍🏻 *राधेश्याम मेश्राम* ✍🏻
*देसाईगंज शहर प्रतिनिधी*
*8390385822*
देसाईगंज (वडसा) –
गडचिरोली जिल्ह्यात भरकटलेल्या हत्तीचा कळप तालुक्यातील जंगल परिसरात दाखल झाला असून शेतशिवारात उभ्या असलेल्या इतर पिक व उभ्या धानपिकाच्या पुंजण्याचे मोठे नुकसान हत्तीच्या कळपाने केले आहे. यामुळे शेतकरी धास्तावले असून वनविभागाने त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यानी केली आहे.
आज मोहटोला-चिखली गावालगत असलेल्या शेतशिवारात हत्तीचा कळप दाखल झाला व उभ्या धान पिकाच्या पुंजण्याची संपूर्ण नासधूस केली आहे. विशेष म्हणजे चिखली-तुकुम येथील गोपाल कामडी व नितूजी बुद्धे यांची धान शेती चांगली झाली होती परंतु हत्तीच्या कळपाने त्यांच्या तोंडचे घास हिसकावले आहे. आणि आता लगत असलेल्या अरततोंडी गावातील शेतशिवारात हत्तीचा हैदोस सुरु आहे.
त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने मोका पंचनामा करुन तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर हत्तीचे दोन ते तीन कळपात गट पडले असून वेगवेगळ्या दिशेने कळपाचे प्रस्थान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याची वडसा वनविभागाने दखल घेत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.