अन् पोलिस जवान बनले शेतमजूर कापूस काढणीसाठी केली शेतक-याला मदत

48

अन् पोलिस जवान बनले शेतमजूर

कापूस काढणीसाठी केली शेतक-याला मदत

अन् पोलिस जवान बनले शेतमजूर कापूस काढणीसाठी केली शेतक-याला मदत
अन् पोलिस जवान बनले शेतमजूर
कापूस काढणीसाठी केली शेतक-याला मदत

✒रवि एस. बारसागाडी़ ✒
9010477883
सिरोंचा तालुका प्रतिनिधी

सिरोंचा : एरवी आपण बघतो की, गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे जवान नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात हातात बंदूक घेवून दिवसरात्र घनदाट जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असतात. मात्र हातात बंदूक घेवून नक्षल्यांचा बिमोड करणारे हेच हात चक्क शेतमजूर बनून शेतक-याच्या मदतीला धावल्याने पोलिस जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
सिरोंचा तालुक्यातील नक्षलग्रस्त रेगुंठा येथील मधुकर लिंगय्या गाडपल्ली (42) हा शेतकरी त्याची पत्नी व आई मिळून शेतातील कापूस वेचणी करीत होते. दरम्यान, या परिसरात एरिया डोनेशन पेट्रोलिंग करीत असलेले उपपोलिस ठाणे रेगुंठाचे प्रभारी अधिकारी विजय सानप,पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील,पोलीस उपनिरीक्षक निजाम सय्यद,त्यांच्या पथकाने त्यांची विचारपूस केली असता, शेतकरी मधुकर गाडपल्ली याने कापूस वेचणी करीता मजूर वेळेवर भेटत नाही. मजुरांना मजुरी देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. त्यामुळे शेतातील कापूस फुटून वा-याने उडत आहे. यामुळे खूप आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले. पीडित शेतक-याची अडचण लक्षात घेत प्रभारी अधिकारी विजय सानप यांनी स्वतः तसेच अभियानादरम्यान असताना पोलिस अंमलदार व राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 11 नवी मुंबईचे पोलिस अंमलदार यांना एकत्र करीत पीडित शेतक-याची मदत करण्याचे ठरविले. पोलिस अधिकारी, जवानांनी चक्क पीडित शेतकरी मधुकरच्या शेतात शेतमजूर बनून कापूस काढण्यासाठी त्यांना मदत केली. यामुळे शेतक-याच्या चेह-यावर एक वेगळेच समाधान व पोलिसांबद्दल आदर दिसून येत होता.
बॉक्स…….
4 क्विंटल कापसाची वेचणी
रेगुंठा येथील शेतकरी मधुकर गाडपल्ली यांची दोन एकर शेती आहे. त्यात त्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. सध्या कापूस पिकाची वेचणी सुरु आहे. मात्र मधूकर यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने ते कुटुंबातील सदस्यांना घेवून कापूस वेचणी करीत होते. यासाठी त्यांना बराच वेळ लागत होता. तसेच मजूर मिळत नसल्याने त्यांच्या कापसाचे मोठे नुकसान होत होते. शेतक-याचे आर्थिक नुकसान लक्षात घेत रेगुंठाचे प्रभारी अधिकारी विजय सानप, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील,पोलीस उपनिरीक्षक निजाम सय्यद व त्यांच्या पथकातील जवानांनी अभियानदरम्यान त्यांच्या दोन एकरातील जवळपास 3 ते 4 क्विंटल कापूस वेचणी करून दिली. त्यामुळे सदर शेतकरी खूप आनंदी झाला आहे. पोलिसांबद्दल त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल त्याने पोलिसांचे आभार मानले आहेत.