चंद्रपुर मध्ये आढळुन आले डायनासोरचे प्राचीन जीवाश्म, प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनाला यश.

56

चंद्रपुर मध्ये आढळुन आले डायनासोरचे प्राचीन जीवाश्म, प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनाला यश.

चंद्रपुर मध्ये आढळुन आले डायनासोरचे प्राचीन जीवाश्म, प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनाला यश.
चंद्रपुर मध्ये आढळुन आले डायनासोरचे प्राचीन जीवाश्म, प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनाला यश.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442📲

चंद्रपूर:- विदर्भातील चंद्रपुर मध्ये प्राचीन डायनासोरचे जीवाश्म आढळून आल्याने खुप महत्वाची माहीती समोर आली आहे. प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे हे माघील अनेक दिवसा पासुन याबाबत संशोधन करत होते. अखेर त्यांचा संशोधनाला यश आल. मिळालेले डायनासोरचे जीवाश्म चार फूट लांब आहेत.

यापूर्वी विदर्भातील पिजदुरा आणि गडचिरोली जिल्ह्यातील वडधम येथे यापूर्वी ही अशाप्रकारचे जीवाश्म सापडले होते. डायनासोरचे जीवाश्म संशोधनामुळं जागतिक स्तरावर पुन्हा एकदा चंद्रपूरला महत्व प्राप्त झाल आहे.

विदर्भातील चंद्रपुर आणि गडचीरोली जिल्हात पुर्वीपासुन जंगल संपदेने नटलेला आहे. या भूभागावर प्राचीन काळात डायनासोरचे अस्तित्व होते हे मिळालेल्या डायनासोरचे जीवाश्म मधून समोर येत आहे. हजारो वर्षा पुर्वी येथील जलाशयात अनेक जलचर प्राण्यांचा वावर होता. तर, महाकाय डायनासोर येथे अस्तित्वात होते. याचे पुरावे जिल्ह्यातील भूभागात आढळले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील पिजदुरा आणि गडचिरोली जिल्ह्यातील वडधम येथे डायनासोरचे जीवाश्म यापूर्वी आढळले आहेत.

देशातील आणि विदेशातील अनेक संशोधक आणि अभ्यासक दरवर्षी गडचिरोली जिल्हातील पिजदुरा येथे भेट देऊन जीवाश्मांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी येत असतात. आता नव्यानं डायनासोरचे जीवाश्म आढळले आहेत. जिल्ह्यातील भूशास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी चार फूट लांब डायनासोरचे जीवाश्म शोधून काढले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात 4 फूट लांब आणि 1 फूट रुंद पायाचे हाड, 4 फूट लांब बरगडीचे हाड प्रा. चोपणे यांनी शोधले. त्यांचा आकार पाहता ते डायनासोर या विशालकाय प्राण्याचे असावे, असा अंदाज प्रा. चोपणे यांनी काढला आहे.

चंद्रपुर जिल्हातील वरोरा तालुक्याच्या पश्चिमेला तुळाना गावाजवळून वर्धा नदी वाहते. नदीच्या पात्रात काही ठिकाणी हिमयुगीन काळातील दगड-गाळाचा थर आढळला. याच ठिकाणी पुरातन बेसाल्ट खडकाचे थर आढळले. दोन्ही थरांची सळमिसळ झाल्याने काळाचा अंदाच घेणे कठीण असल्याचे चोपणे म्हणतात. स्थानिक शेतकरी विजय ठेंगणे, शाळकरी मुले नदी पात्रात फिरत असताना त्यांना हाड सदृश्य खडक आढळला. याची माहिती संशोधक प्रा. चोपणे यांना मिळाली. चोपणे यांनी जीवाश्म स्थळी भेट देवून निरीक्षणे केले. ती हाडे जीवाश्म असून डायनासोर किंवा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याची असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.