तालुक्यात बोगस कामांची भरमार! पंचायत समिती सदस्यांच्या तक्रारी कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!

50

तालुक्यात बोगस कामां

तालुक्यात बोगस कामांची भरमार! पंचायत समिती सदस्यांच्या तक्रारी कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!
तालुक्यात बोगस कामांची भरमार!
पंचायत समिती सदस्यांच्या तक्रारी कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!

ची भरमार!
पंचायत समिती सदस्यांच्या तक्रारी कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!

देवेंद्र सिरसाट.
9822917104
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर

हिंगणा तालुक्यात बोगस कामं होत असल्याची तक्रार दस्तुरखुद्द पंचायत समिती सदस्यांनी सभागृहात केल्यावर पंचायत समीतीचे अधिकारी मात्र हे तुमच्या अधिकारात येत नसलेल्या कामं पुर्ण झाल्यावर सांगत चला अशी तंबी पंचायत समिती सदस्यांना दिल्याने हे सदस्य आक्रमक झाले आहेत.हिंगणा पंचायत समिती क्षेत्रात, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा इतर फंडाच्या माध्यमातून अंतर्गत मार्ग, शाळा इमारत, अंगणवाडी बांधकाम असो की नाल्या असे कामं राबवण्यात येतात पण ठेकेदार आणि पंचायत समितीचे इंजिनिअर व अधिकारी यांच्या आर्थिक साठगाठ मुळे हे कामं बोगस होतात आणि मुदती पुर्वीच निकामी होतात,याच संदर्भात पंचायत समिती सदस्य संजय ढोढरे, लिलाधर पटले व सचिन भोयर यांनी पंचायत समिती सभागृहात सवाल उपस्थित केला असता,हे तुमचं काम नाही, तुम्ही कामं पुर्णत्वास गेल्यावर कळवावे असे अधिकारी यांनी दरडावून सांगितल्याचा आरोप सदर पंचायत समिती सदस्यांनी केला.तालुक्यात ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांची आर्थिक साखळी असल्याने मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे कामं होत आहे . सदस्यांच्या म्हणण्यानुसार जर कामं पुर्ण झाल्यावर तक्रार केली तर त्याचा काहीच फायदा होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराचे बिलं वैगरे निघालेले असतात आणि चौकशी करणारे अधिकारी हि तेच असतात, त्यामुळे जेव्हा कामं बोगस पणे सुरू असतात तेव्हा पंचायत समिती सदस्यांनी जर तक्रार केली तेंव्हा संबंधित अधिकाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी करावी व सदस्यांसह नागरिकांचही समाधान करावं असी मागणी पंचायत समिती सदस्य संजय ढोढरे व इतरांनी केली.