अमरावती दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक
अमरावती दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक

अमरावती दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक

अमरावती दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक
अमरावती दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016

अमरावती : – जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेल्या गुन्ह्यांची प्रकरणे आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी त्यांच्या कक्षात आढावा घेतला. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीला समाज कल्याणच्या सहायुक्त आयुक्त माया केदार, अमरावती शहरचे सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण डुंबरे, अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, नागरी हक्क व संरक्षण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक केशव सुलभेवार, शासकीय अभियोक्ता आदी उपस्थित होते.
ऑक्टोबर अखेर शहरीव ग्रामीण हद्दीत घडलेल्या 13 प्रकरणांचा आढावा श्री बिजवल यांनी घेतला. समितीसमोर आलेल्या प्रकरणांमधील व्यक्तींना तातडीने आर्थिक सहाय्य प्रदान करावे. आर्थिक सहाय्य करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. निधी मागणीची प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
मागील महिनाअखेर शहरी व ग्रामीण भागातील 42 प्रकरणांचे 56 लक्ष रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून शहरी भागातील 15 व ग्रामीण भागातील 28 प्रकरणांचा तपास सुरु असलयाची माहिती माया केदार यांनी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here