साहेब, तुम्ही जीवाची हमी द्या आम्ही लस घेतो लोकांच्या प्रश्नाने संवर्ग विकास अधिकारी अचंबित

52

साहेब, तुम्ही जीवाची हमी द्या आम्ही लस घेतो

लोकांच्या प्रश्नाने संवर्ग विकास अधिकारी अचंबित

साहेब, तुम्ही जीवाची हमी द्या आम्ही लस घेतो लोकांच्या प्रश्नाने संवर्ग विकास अधिकारी अचंबित
साहेब, तुम्ही जीवाची हमी द्या आम्ही लस घेतो
लोकांच्या प्रश्नाने संवर्ग विकास अधिकारी अचंबित

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी / धाबा:-कोरोना वरील लसीचे पहिले आणि दुसरे डोस पूर्ण झाले पाहिजे यासाठी तालुका प्रशासन जिवाचा आटापिटा करीत असून तालुक्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी गावोगावी जिथे कमी लसीकरण आहे तिथे भेटी देण्याचा सपाटा चालवला असून नवेगाव -कि र मिरी येथील भेटीत लाभार्थ्यांनी “साहेब आम्ही दुसरा डोस घेतल्यावर आमच्या जीवाला काही होणार नाही याची तुम्ही लेखी हमी द्या आम्ही लगेच लस घेतो” असा प्रश्न केल्यावर संवर्ग विकास अधिकारी ही अचंबित झाले.
एकीकडे कोरोणा वरील उपलब्ध लस घेणे लाभार्थ्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे असे म्हटले जात असले तरी प्रशासनाच्या वतीने ओमिक्रानच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर 100% लसीकरण झाले पाहिजे यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी दुसऱ्या डोसचे लसीकरण कमी असलेल्या गावांची यादी तयार करून तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी त्या गावांना भेटी देत आहे आज नवेगाव _कीरमिरी येथे दुसऱ्या डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी असल्या बाबत गटविकास अधिकारी शेषराव बुलकुंडे यांनी भेट दिली असता. त्यांना लसीकरण केंद्रावर सरपंच अनुराग फुलझेले, ए एन एम झिल टे, एम पी डब्ल्यू ,अंगणवाडी सेविका चूनारकर , आशा गटप्रवर्तक प्रविना सचिन फुल झेले, आशा मंगला ताजने उपस्थित होते या सर्वांनी नवेगाव किर्मिरी येथे दुसऱ्या डोसचे लाभार्थी पूर्ण झाले पाहिजे म्हणून आपापल्या परीने प्रयत्न केले होते तरीसुद्धा बरेच लाभार्थी दुसरा डोस घेण्यात समोर न आल्यामुळे त्याच्या कारणा बाबत विचारणा केली असता उपस्थित लाभार्थ्यांनी वरील प्रश्न विचारल्याने खुद्द संवर्ग विकास अधिकारी अचंबित झाले. त्यांनी आपल्या परीने लाभार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. व उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही आपापल्या पद्धतीने असे प्रश्न निर्माण करणाऱ्या सर्वांचे ऐकून घेऊन ते डोस कसे घेतील या संबंधाने समुपदेशन करा अशा सूचना दिल्या. प्रशासन जरी आटापिटा करत असले तरी बऱ्यापैकी दहावी-बारावी आणि पुढील शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित लाभार्थ्यांना मध्येच सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच संभ्रम व गैरसमज आढळून येत आहेत.