ई ग्राम स्वराज प्रणालीवर महाराष्ट्रातली पहिली नोंद सोनापूर देशपांडे ग्रामपंचायत ची

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
धाबा:-15 व्या वित्त आयोगाच्या ऑनलाईन खर्चाचा ताळमेळ करून ऑनलाइन जमाखर्च नोंदवण्याच्या प्रक्रियेत सोनापूर देशपांडे ग्रामपंचायत महाराष्ट्रात पहिली नोंद करणारी ग्रामपंचायत ठरली आहे.
ई ग्राम स्वराज अर्थात (पी एफ एम एस )या 15 व्या वित्त आयोगाच्या प्रणालीबाबत माहिती देत ऑनलाइन जमा खर्च नोंदवण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या होत्या या सूचना महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितीला प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार पंचायत समित्यांनी सर्व ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या जमाखर्चाची ऑनलाईन नोंद करण्याचे सूचित केले होते .त्यानुसार 23 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सोनापूर देशपांडे ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगाचा जमाखर्च ऑनलाइन पद्धतीने नोंदवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम नोंद करण्याचा मान पटकाविला आहे. ही ऑनलाइन प्रक्रिया यशस्वी करण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली शेठी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मतकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत कपिल कलोडे, गोंडपिपरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शेषराव बुल कुंडे, पंचायत समितीचे लेखाधिकारी महेंद्र कन्नाके, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायत अनिल शिंदे, सीएससी से जिल्हा व्यवस्थापक छगन बावनकर, सीएससी चे तालुका व्यवस्थापक अमोल वानखेडे व तालुका संगणक परिचालक अंकुश झाडे यांच्या संयुक्त परिश्रमातून सोलापूर देश पडला हे यश प्राप्त करता आले असून गोंडपिपरी पंचायत समिती ही ऑनलाईन जमाखर्च नोंदवण्याचा कामात अव्वल आली आहे.