जुनी पेन्शन संघर्ष यात्रेला नागभीड तालुक्यात उत्तम प्रतिसाद…
हजारोंच्या संख्येने कर्मचारी संघर्ष यात्रेत सहभागी होणार…!!
विविध विभागांना भेटी व सहविचार सभेतून जनजागृती..!!

हजारोंच्या संख्येने कर्मचारी संघर्ष यात्रेत सहभागी होणार…!!
विविध विभागांना भेटी व सहविचार सभेतून जनजागृती..!!
✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड : – चंद्रपूर येथे 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या जुनी पेन्शन संघर्ष यात्रेनिमित्त नागभीड तालुक्यातील सर्व विभागातील संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच सभासदांची विचार -विनिमय सभा आयोजित करण्यात आली होती. तसेच तहसीलदार,सवर्ग विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी इत्यादीना निवेदने देण्यात आली तसेच तालुक्यातील प्रत्येक शाळा, कार्यालय यात भेट देत संघर्ष यात्रेविषयी जनजागृती करण्यात आली….
या विचार- विनिमय सभेमध्ये अनेक संघटनांचे अध्यक्ष ,पदाधिकारी तसेच सभासद यांनी उपस्थिती दर्शवली तसेच सर्व संघटनांच्या अध्यक्षांनी 6 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथे होणाऱ्या जुनी पेन्शन संघर्ष यात्रेला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच 6 डिसेंबर रोजी संघटनेच्यावतीने जुनी पेन्शन संघर्ष यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले… आजच्या विचार-विनिमय सभेसाठी उपस्थित झालेल्या सर्व संघटनांच्या अध्यक्ष, पदाधिकारी तसेच सभासद यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले…!!
सदर नियोजन कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष – श्री. सतीश मेश्राम सर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. श्रीकांत मंदे सर,
अखिल नागभीड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री. संतोष आंबोरकर सर,पुरोगामी शिक्षक समिती चे तालुका अध्यक्ष श्री. निरंजन गजभे सर,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे श्री. शागिर शेख सर,शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष श्री. अमोल रेवसकर सर,
ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष सौ. उईके मॅडम तसेच प्रवीण शेंडे सर, पिराजी कांदे सर, मिसार सर, नगरे सर, स्वप्नील नवघडे सर,लोणारे सर व जुनी पेंशन संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते…