बिबट्याच्या हल्लात पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू बल्लारपूर येथील घटना; हल्यात पोलिस उप निरीक्षकाचा उपचाादरम्यान मृत्यू

49

बिबट्याच्या हल्लात पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

बल्लारपूर येथील घटना; हल्यात पोलिस उप निरीक्षकाचा उपचाादरम्यान मृत्यू

बिबट्याच्या हल्लात पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू बल्लारपूर येथील घटना; हल्यात पोलिस उप निरीक्षकाचा उपचाादरम्यान मृत्यू
बिबट्याच्या हल्लात पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू
बल्लारपूर येथील घटना; हल्यात पोलिस उप निरीक्षकाचा उपचाादरम्यान मृत्यू

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर (चंद्रपूर) : चंद्रपूरहून बल्लारपूरच्या दिशेने येत असताना दुपारी १२ च्या सुमारास पावर हाऊस जवळ झुडपात लपलेल्या बिबट्याने पोलिस उप विभागीय अविनाश पडोळे यांच्यावर झडप घातली. या घटनेत पडोळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र, उपचाादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.आज दुपारच्या सुमारास बल्लारपूर शहराच्या प्रवेशद्वार जवळ पावर हाऊस शेजारी झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने अविनाश पडोळे यांच्यावर झडप घातली. या हल्यात अविनाश पडोळे एम.एच. ३४- ए.टी – २०५७ दुचाकीसह खाली पडले. यात त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली.
पाठीमागून येणाऱ्या एका वाहनचालकाने धाव घेतल्याने बिबट झुडपात पळून गेला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, उपचाादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अविनाश पडोळे हे चंद्रपूर ठाण्यात वायरलेस विभागात पोलिस उप निरीक्षक पदावर कार्यरत होते. ते बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वार्ड येथील रहिवाशी आहेत. पडोळे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.घटना स्थळा लगत लाखो रुपये खर्च करून देखणे असे स्वागत गेट तयार करण्यात आले आहेत. मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने परिसरात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. वाढली आहे. याकडे नगर परिषद आणि वनविभाग सर्रास दुर्लक्ष करीत आहे. यापूर्वीही या भागात अश्याप्रकराच्या घटना घडल्या असून सबंधित प्रशासनाला नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही. असा आरोप शहरातील नागरिक करीत आहे.