क्रीडाक्षेत्रातून व्यक्तिमत्व विकास होतो! माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन गोमनी येथे व्हॉलीबाल सामन्यांचे उदघाट

55

क्रीडाक्षेत्रातून व्यक्तिमत्व विकास होतो!

माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन

गोमनी येथे व्हॉलीबाल सामन्यांचे उदघाट

क्रीडाक्षेत्रातून व्यक्तिमत्व विकास होतो! माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन गोमनी येथे व्हॉलीबाल सामन्यांचे उदघाट
क्रीडाक्षेत्रातून व्यक्तिमत्व विकास होतो!
माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन
गोमनी येथे व्हॉलीबाल सामन्यांचे उदघाट

/अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/

*मुलचेरा:*- क्रीडाक्षेत्र व खेळातून जिद्द, चिकाटी येते आणि व्यक्तिमत्व विकास होतो असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.
त्या शनिवार दिनांक 3 डिसेंबर रोजी मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथे व्हालीबाल उदघाटना प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.

उदघाटनीय स्थानावरून पुढे बोलतांना माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम म्हणाले की, शिक्षण, क्रीडा व कला क्षेत्रातून व्यक्तिमत्व विकास होतो व खास करून क्रीडामुळे युवकांमध्ये खिलाडीवृत्ती येते त्यामुळे युवकांनी शिक्षणासोबतच खेळात अधिक आवड आणि रुची दाखवून आपली चमकदारी दाखवावी असे म्हणत भाग्यश्रीताई आत्राम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी फित कापून व फलंदाजीत फटका मारून (ट्रायल) व्हालीबाल सामन्यांचे शानदार उदघाटन माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.

यावेळी उपस्थित उमेश कडते सरपंच ग्रामपंचायत अंबटपल्ली साईनाथ चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत गोमणी शकुंतला मरापे ग्रामपंचायत सदस्य गोमनी अविनाश शेंडे सेवानिवृत्त शिक्षक श्री येलमुले सर श्री अजय भाऊ विरमलावार सावकार .सत्यम . देवाजी .शैलाताई गगुवार .तसेच ग्रामपंचायत गोमनी व ग्रामपंचायत अंबटपल्ली चे सर्व सदस्य व राजे धर्मराव व भगवंतराव आश्रम शाळा चे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद व गावातील नागरिक उपस्थित होते. चॅलेंजर व्हाली क्लब गोमनी बाल मंडळाचे अध्यक्ष साईचरण गड्डमवार, उपाध्यक्ष विप्लव कुसनाके, सचिव पवन मडावी , सहसचिव रीलेश चोधरी आदी आणि खेळाडू, प्रेक्षक व असंख्य युवक उपस्थित होते.