अंबुजा सिमेंट फाँऊडेशन, उप्परवाही, (BCI) च्या वतीने मौजा पाचगाव येथे जागतीक मृद्रा दिन साजरा.

✒संतोष मेश्राम✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण 99234 97800
राजुरा : – सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे आज दिनांक 05 डिसेंबर ला मौजा पाचगाव येथे अंबुजा सिमेंट फाँऊडेशन,उप्परवाही उत्तम कापुस उपक्रम (BCI) च्या वतीने श्री. विशाल भोगावार यांच्या मार्गदर्शना खाली जागतीक मृद्रा दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन श्री.लक्ष्मन नुलावार, दयारामजी डोंगे, निलकंट सातपुते, संदीप आगरकर, श्री.आकाश नुलावार (अभियंत्ता) उप्पस्थित होते. तसेच गावातील युवा शेतकरी श्री. गणेश भोयर, विकास वाघाडे, अक्षय बावणे यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.
उपस्थित शेतकरी लोकांना माती म्हणजे काय? माती ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. शेतीतील माती ही झिजलेल्या खडकांचा निव्वळ चुरा नसून सजिव आणि क्रियाशील आहे. त्यामुळेच जमिनीवर वनस्पती वाढू शकतात. अन्नधान्य आणि चारा निर्मिती करतात.त्यामुळे मातीची निगा राखणे काळाची गरज आहे. तसेच माती परीक्षणाचे महत्व,सेंद्रिय कर्ब, कालकस चे महत्व ,व्रुक्षा रोपणा चे महत्व ,म्रुदा आरोग्य पत्रीकेचे वाचण व आंतरपीकाचे महत्व समजावुन सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन श्री.रुपेश जी गेडेकर (प्रक्षेत्र अधिकारी ACF,BCI) व श्री.गोपाल जी जंबुलवार (प्रक्षेत्र अधिकारी ACF,BCI) उपस्थित होते.