शाळा बंद पण शिक्षण चालू ग्रामपंचायत पिंपळखुटा संगम येथे स्तुत्य उपक्रम.
विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशिम :- जिल्हातील शेलुबाजार जवळ असलेल्या ग्रामपंचायत पिंपळखुटा संगम येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचा अप्रतिम कार्यक्रम शासनाच्या निर्देशानुसार या शाळेतील संतोष तिवसकर तथा तथा सर्व शिक्षक वृंदांनी लाँकडाऊन काळातही आँनलाईन, सामुदायिक शैक्षणिक उपक्रमाने आँफलाईन तथा जमेल त्या पद्धतीचा अवलंब करून आपल्या शाळेचा शैक्षणिक दर्जा कायम ठेवण्यासाठी शेवटच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानकार्यासह अभ्यासात नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य व स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्यात आले.
तालुक्याला लाभलेले नवनियुक्त शिक्षण अधिकारी सुभाषराव पवने यांच्या सत्कार व वाढदिवसानिमित्त त्यांना युवा सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन भाऊ धोटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ सन्मानित करण्यात आले
या प्रसंगी विस्तार अधिकारी श्रीकांतजी माने साहेब, हिसई केंद्र कुलपती अरून पंडित, गावचे प्रथम नागरिक सरपंच सुदर्शनभाऊ धोटे, सायखेडा गावचे प्रशासक नारायणजी दुबे, शा. समिती अध्यक्ष प्रदिप पडघान, सामाजिक कार्यकर्ते श्री गणेशराव परंडे दिपक खाडे, ईत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत लाँकडाऊनचे पालन करत संतोष तिवसकर सरांच्या संकल्पनेतून सत्कारमुर्ती सुभाषराव पवने गटविकास अधिकारी पंचायत समिती मंगळुरपीर व पिंपळखुटाचे सरपंच धोटे यांच्यासह सर्व प्रमुख पाहुन्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्यात आले.
कार्यक्रम सादर प्रसंगी हिसई केंद्राचे केंद्रप्रमुख अरुन पंडित व पवने साहेबांनी मार्गदर्शन करताना या शाळेतील शिक्षक तथा शिक्षण समितीचे आणि गाव प्रशासनाचे तोंडभरुन कौतुक करत शिस्तबद्ध पद्धतीवर खुप स्तुती सुमने उधळून असेच सर्वांचे सहकार्य असल्यास हि शाळा राज्यस्तरावर झळकल्या शिवाय राहणार नाही. ह्या कार्यक्रम आयोजित व यशस्वितेसाठी मुख्यध्यापक गावंडे, सहशिक्षक, संतोष तिवसकर, शाळा सफाई कर्मचारी घुले यांनी परिश्रम घेतले