नागपुर: परवानगी नसताना झाडांच्या फांद्या छाटल्या, क्रिम्स रुग्णालयाविरोधात महानगर पालिकाने केली एफआयआर.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442📲
नागपूर:- शासन झाडे जगवा, झाडे वाचवा म्हणून दरवर्षी करोडो रुपये खर्च करत असतात. पण काही लोक अवैधरित्या झाडाची कटाई करुन ध्यन्यता मानत आहे. त्यामूळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ह्रास होत आहे. त्यामूळे नागपुर महानगरपालिका प्रशासनाने अवैधरित्या झाडाची कटाई केली म्हणून क्रिम्स रुग्णालयाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
क्रिम्स हॉस्पिटलने नागपुर महानगर पालिकेच्या परवानगीविना गुलमोहर, बादाम आणि कडूलिंबाच्या झाडांच्या फांद्या अवैधरित्या तोडल्या. या प्रकरणी नागपुर येथील रामदासपेठ मधील क्रिम्स हॉस्पिटल विरोधात सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शनिवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी नागपुर महामहानगर पालिकाच्या आयुक्तांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे व उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांना हॉस्पिटल परिसरातील झाडांची पाहणी करण्याचे निर्देश दिले. पाहणीनंतर उद्यान निरीक्षक अनंत नागमोते यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
हॉस्पिटल परिसरातील गुलमोहर, बादाम आणि कडूलिंबाच्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आलेल्या आहेत. यासंबंधी नागपुर महानगर पालिकेची कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याची बाब पुढे येताच त्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हॉस्पिटलविरोधात पोलिसात तक्रार नोंदविण्याचे निर्देश दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उद्यान निरीक्षकांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदविली.