सावनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामुहिक बुद्ध वंदनेचे आयोजन संपन्न.

54

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी,मो.नं-9822724136

सावनेर-06 डिसेंबर 2021 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवक जागृती मंडळ सावनेर वतीने महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बस स्थानक जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा येथे महामानवाच्या प्रतीमेला विनम्र अभिवादन,आदरांजली वाहुन शेकडो बांधवांचा उपस्थित सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते रामराव मोवाडे होते. तर यावेळी न.प.उपाध्यक्ष अँड अरविंद लोधी,पत्रकार सुधाकर बागडे,शिवसेना नेते उत्तमराव कापसे,सुप्रसिद्ध व्यवसायी जितेंद्र पोपली,कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती बाबाराव पाटील,अरुण रुषीया, बालू चौरसिया प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पुजा अर्चना, माल्यार्पणा नंतर सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात येवुन आदरांजली वाहण्यात आली.मंचकावर उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रम स्थळी उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विक्की शेंडे,होमेश्वर डोंगरे, शिक्षीका कांताताई बोरकर,चंदु गोडुळे,अमीत गायकवाड, अंजली कनोजिया यांनी मोलाचे सहकार्य केले.युवक जागृती मंडळाचे सचिव विक्की शेंडे यांनी आभारप्रदर्शन केले.