जुनी पेन्शनस संघर्ष यात्रेत सहभागी व्हा : यशवंत कातरे.

53

जुनी पेन्शनस संघर्ष यात्रेत सहभागी व्हा : यशवंत कातरे.

जुनी पेन्शनस संघर्ष यात्रेत सहभागी व्हा : यशवंत कातरे.
जुनी पेन्शनस संघर्ष यात्रेत सहभागी व्हा : यशवंत कातरे.

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर.
देवेंद्र सिरसाट.
9822917104

हिंगणा- : 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्या नंतर नियुक्त शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पेन्शन संघर्ष यात्रा काढली जात आहे. 22 नोव्हेंबर रोजी आजाद मैदान, मुंबई येथून संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे.ही यात्रा ७डिसेंबरला सायंकाळी नागपूर जिल्ह्यात पोहोचणार आहे आणि ८ डिसेंबरला संघर्ष यात्रेचे रूपांतर भव्य पेन्शन सभेत होणार आहे.
या संघर्ष यात्रेला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन नागपूर विभागाने जाहीर पाठिंबा दिलेला असून या यात्रेत बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आपली ताकद शासनाला दाखवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विभागीय अध्यक्ष यशवंत कातरे यांनी केले आहे.
या योजनेचा विरोध करण्यासाठी आणि जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी राज्यातील 66 संघटना एकत्र आलेल्या आहेत.
दि. ७डिसेंबरला सायंकाळी पेन्शन संघर्ष यात्रा उमरेड येथे पोहोचेल. त्यानंतर दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता तहसील कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात होईल. सकाळी 10 वाजता संघर्ष यात्रा आशिर्वाद मंगल कार्यालय, उमरेड येथे पोहचून या ठिकाणी भव्य पेन्शन सभा होणार आहे. या पेन्शन संघर्ष यात्रेत नागपूर जिल्ह्यातील असंख्य एनपीएस व डीसीपीएस धारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
यासंदर्भात संघटनेची नियोजित सभा क्लब हाऊस, दिक्षित नगर, नागपूर येथे पार पडली. या सभेला विभागीय अध्यक्ष यशवंत कातरे, विभागीय उपाध्यक्ष प्रवीण भोगे, नागपूर जिल्हाध्यक्ष कोहिनूर वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश लडके, जिल्हा सचिव महेंद्र टुले, जिल्हा कार्याध्यक्ष महेश गीरी, जिल्हा कोषाध्यक्ष केशवानंद बमनोटे, शहर सचिव देविदास येलुरे, शहर कार्याध्यक्ष विशाल बोरकर तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.