हिंगणघाट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनीर्वान दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

✒प्रशांत जगताप✒
कार्यकारी संपादक
📲9766445348📲
हिंगणघाट:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हिंगणघाट शाखेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वान दिन असल्यामुळे कतर कतर खुण का बाबा तेरे नाम का बोलून त्यानंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिर आयोजन करून 65 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला गोरख भगत सर, अशोक भालशंकर, बुद्धमजी कांबळे, अनिल मून, विक्रांत भगत, ललित धनविज, रसपाल शेंद्रे, सुहास जीवनकर, अजय डांगरे, बबीताताई वाघमारे, अनुलाताई सोनकुवर, अस्मिता भगत, अस्मिता जांभुळकर, कुणाल वासेकर, वर्धा येथील सामान्य जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रविण गावंडे, डॉ. राजू रामटेके यांनी सहकार्य केले