हिंगणघाट डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहून वेणा नदी तीरावर योग शिबीराची सांगता. ● वेणा नदी संवर्धन समिती आणि पतंजली परिवाराचे आयोजन.

58

हिंगणघाट डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहून वेणा नदी तीरावर योग शिबीराची सांगता.

● वेणा नदी संवर्धन समिती आणि पतंजली परिवाराचे आयोजन.

हिंगणघाट डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहून वेणा नदी तीरावर योग शिबीराची सांगता. ● वेणा नदी संवर्धन समिती आणि पतंजली परिवाराचे आयोजन.
हिंगणघाट डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहून वेणा नदी तीरावर योग शिबीराची सांगता.
● वेणा नदी संवर्धन समिती आणि पतंजली परिवाराचे आयोजन.

✒प्रशांत जगताप✒
कार्यकारी संपादक
📲9766445348📲

हिंगणघाट,6 डिसें:- योग प्राणायाम शिबिर व वेणा नदी परिसर स्वच्छता (नदी संवर्धन जागृती) अभियान, वेणा नदी संवर्धन समितीच्या व पतंजली योग समिती परिवाराच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय (दि.5 ते 6 डिसेंबर) रोजी योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.

वेणा नदी तीरावर, धोबी घाट परिसर येथे सकाळी 5 ते 9 पर्यत योग व नदी स्वच्छता (नदी संवर्धन जागृती अभियान) घेण्यात आले होते. प्रथम दिवशी योग प्राणायाम घेण्यात आले, व नदी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दुसऱ्या दिवशी योग प्राणायाम नंतर बोधी वृक्ष पिंपळ या झाडांचे रोपन करण्यात आले. त्यानंतर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फुल माला अर्पण करुन त्यांना आदराजली वाहत अभिवादन करण्यात आले.

यावेळीस हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सपंत चौव्हान, शहरातील डॉ. आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचीव अनिल जवादे, पतंजली समितीचे तालुका प्रभारी वसंत पाल, योगेश सुंकटवार, रवि प्रकाश भालेराव, प्रभाकर कोळसे, वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजुरकर, तुषार हवाईकर, अशोक मोरे, संदेश मुन, नलिनी सयाम, सीमा मेश्राम, संगीत कडू, निर्मला भोंगाडे, सींधुताई दखणे, राजश्री बाबोंळे व संपूर्ण मित्र परिवार यांची उपस्थिती होती.

यासाठी पतंजली समितीचे गोपाल मांडवकर, डॉ. नाखले, प्रा. खडसे, प्रमोद भाईमारे, अनिल राजपांडे, बाकडे, आयुष हावगे, रामानंद चौधरी, सुभाष ठाकरे, दामोदर हिवरकर, लक्ष्मण तेजने आदींनी योग प्राणायाम शिबीराचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.