जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कार्यशाळा व मेळावा उत्साहात

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016
बुलडाणा : – जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेव्दारे कोविड-19 च्या नियमांचे पालन करुन जागतिक दिव्यांग दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा व मेळावा जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहात पार पडला. या दिव्यांग कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती उपस्थिती होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मिन चौधरी, अधिक्षक श्रीमती शामला खोत, तहसिलदार श्रीमती प्रिया सुळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक नायब तहसिलदार संजय बनगाळे यांनी दिव्यांग दिन हा 1992 पासून जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने आयोजीत करण्यात येतो असे सांगून जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 10 टक्के लोक हे दिव्यांग असून या वंचीत घटकाला समाजप्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन केले.
दिव्यांग कार्यशाळेमध्ये जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी दिव्यांगांच्या बाबतीत मार्गदर्शन करुन जिल्हयातील दिव्यांग घटकाला न्याय देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध् असल्याचे प्रतिपादन केले. सोबतच कार्यशाळेचे प्रमुख पाहूणे अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे यांनी दिव्यांग कायदा 2016 व प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
संचालन दिव्यांग संघटनेचे जिल्हा सचिव किसन केणे मानेगांवकर यांनी केले. कार्यशाळेला जिल्हा दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी सुरेश जगताप, बबन कासतकर, योगेश मुळे, अनंता पाटील, श्रीमती अपेक्षा जाधव, प्रविण डोंगरे, रामेश्वर जाधव, गजानन हिंगे, नंदकिशोर येसकर व जिल्हयातील सर्व कार्यालयातील दिव्यांग अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यशाळा व मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दिव्यांग व महसुल कर्मचारी यांनी प्रयत्न केले. आभार प्रदर्शन सुरेश जगताप यांनी केले.