विधान परिषद निवडणुक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

58

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
986002016

बुलडाणा :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकोला – वाशिम – बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2021 जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे निरीक्षक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्ह्यातील शेगांव, जळगांव जामोद, नांदुरा व बुलडाणा येथील मतदान केंद्रांची पाहणी आज 6 डिसेंबर रोजी केली. दरम्यान विश्राम गृह बुलडाणा येथे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी निवडणूक गौरी सावंत, उपविभागीय अधिकारी श्री. हांडे आदींसमवेत निवडणूकीसंदर्भात चर्चाही करण्यात आली.

निवडणूकीचे निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी शेगांव, जळगांव जामोद येथील तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रांची तर नांदुरा येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात असलेल्या मतदान केंद्राची पाहणी केली. त्याचप्रमाणे बुलडाणा येथे तहसिल कार्यालयातील मतदान केंद्रांची पाहणीसुद्धा त्यांनी केली. यावेळी त्यांनी मतदार संख्या, मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदान केंद्रांवरील साहित्य, प्रशिक्षण आदींची माहिती संबधित अधिकाऱ्यांकडून घेतली. जळगाव जामोद येथे तहसीलदार शितल सोलाट, नांदुरा येथे तहसिलदार राहुल तायडे, बुलडाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार राहुल तायडे आदी उपस्थित होते.