शेलू बाजार परिसरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दुर्गा मातेला शांततेत निरोप.
वाशिम जिल्हा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने नियम व काही अटींवर नवरात्रौत्सवास परवानगी दिली होती. कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेऊन राज्यात नवरात्रौत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान आज शेलू बाजार परिसरात कोणताही जल्लोष न करता दुर्गेला शांततेत निरोप देण्यात आला.
विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशिम/शेलुबाजार:- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने नियम व काही अटींवर नवरात्रौत्सवास परवानगी दिली होती. कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेऊन राज्यात नवरात्रौत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान आज वाशिम जिल्ह्यात कोणताही जल्लोष न करता दुर्गेला शांततेत निरोप देण्यात आला.दुर्गेला शांततेत निरोप देण्यात आला.
दरवर्षी ढोल ताशांच्या निनादात वाजत गाजत दुर्गा विसर्जन करण्यात येते, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सव शांततेत पार पडला. कोरोनाबाबत प्रशासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत दुर्गा विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात सामाजिक अंतर पाळत भजनी मंडळांकडून दुर्गा विसर्जन मिरवणुक काढण्यात आल्याचे पहायला मिळाले. तर साध्या पद्धतीने तलावात दुर्गा विसर्जन करण्यात आले.